AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fatty Liver Diet : फॅटी लिव्हरपासून हवी आहे सुटका ? या पदार्थांपासून रहा दूर

लिव्हर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यकृत निकामी झाल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यकृत खराब होण्यामागे आपली जीवनशैली आणि आहार यांचा मोठा हात असतो.

Fatty Liver Diet : फॅटी लिव्हरपासून हवी आहे सुटका ? या पदार्थांपासून रहा दूर
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 28, 2023 | 10:40 AM
Share

नवी दिल्ली – यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येला (fatty liver problem) सामोरे जावे लागते. फॅटी लिव्हरमुळे आपले यकृत पाहिजे तसे कार्य करू शकत नाही. फॅटी लिव्हरचे 2 प्रकार आहेत – अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, जो अल्कोहोल (alcohol) किंवा मद्याच्या अतिरिक्त सेवनामुळे होतो आणि दुसरा म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, आहाराची काळजी न (unhealthy food habits) घेतल्याने ही समस्या उद्भवते.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या बहुतेक अशा लोकांना भेडसावते जे लठ्ठ आहेत किंवा ज्यांची जीवनशैली अतिशय खराब आहे. अस्वास्थ्यकर किंवा अनारोग्यकराक पदार्थ खाल्ल्यानेदेखील फॅटी लिव्हरची समस्याउद्भवते.

फॅटी लिव्हरच्या समस्येपासून मुक्तता हवी असेल तर आहार अतिशय महत्वाचा ठरतो. यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या रक्तातील रसायनांचे प्रमाण संतुलित करतो. यकृत पित्ताचा रस देखील तयार करतो ज्यामुळे यकृतातील खराब पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. याशिवाय आपल्या शरीरासाठी प्रथिने तयार करणे, लोह साठवणे आणि पोषक तत्वांचे ऊर्जेत रूपांतर करणे अशी कार्येदेखील यकृताद्वारे केली जातात.

फॅटी लिव्हरच्या समस्येचा सामना करण्यासाठी, कमी चरबी आणि जास्त फायबर आणि प्रोटीन्स असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक ठरते. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे फॅटी लिव्हरची समस्या देखील वाढते.काही असे पदार्थ आहेत, जे खाल्ल्याने फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्याबद्दल जाणून घेऊया

यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी या गोष्टी सेवन करा

ओट्स- ओट्समध्ये डाएट्री फायबर आढळते. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यात लो फॅट आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

ॲव्होकॅडो –ॲव्होकॅडोमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स आढळतात. तसेच ॲव्होकॅडो हे ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा उत्तम स्त्रोत मानला जातो. हे खाल्ल्याने फॅटी लिव्हरची समस्या दूर होते आणि खराब झालेले यकृतही दुरुस्त होते.

टोफू- टोफू हे सोयापासून बनवले जाते, त्यामुळे ते यकृतासाठी चांगले असते. त्याचे सेवन केल्यामुळे यकृतातील चरबी कमी होण्यास मदत होते. टोफू हा प्रोटीन्सचा एक चांगला पर्याय असून तो यकृतासाठी खूप चांगला असतो. काही सोया पदार्थांमध्ये शेंगा, सोयाबीन स्प्राउट्स आणि सोया नट्स यांचा समावेश होतो.

फळे- कमी प्रमाणात फळे खाल्यानेदेखील यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते. संत्री आणि द्राक्षे यकृतासाठी चांगली असतात. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते. द्राक्षांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स यकृताचे संरक्षण करतात. हे अँटीऑक्सिडंट यकृताचे नुकसान होण्यापासून वाचवतात.

भाज्या – आहारात पालेभाज्यांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. जुनाट आजार टाळण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास भाज्यांच्या सेवनाने मदत होते. विशेषतः यकृतासाठी भाज्या चांगल्या असतात. यामध्ये ब्रोकोली, फ्लॉवर, ब्रसेल्स स्प्राउट्स, पालक या भाज्यांचा समावेश आहे.

लसूण – फॅटी लिव्हरच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरते. याशिवाय वजन कमी करण्यासाठीही लसणाचे सेवन उपयोगी ठरते.

या पदार्थांपासून रहावे दूर

साखर- साखर फक्त आपल्या दातांसाठीच वाईट नाही तर त्यामुळे यकृताचेही नुकसान होते. जास्त शुद्ध साखर आणि उच्च फ्रॅक्टोजमुळे चरबी वाढते, ज्यामुळे यकृताचे आजार होतात. काही अभ्यासानुसार, तुमचे वजन जास्त नसले तरीही साखर अल्कोहोलप्रमाणे यकृताचे नुकसान करते. तुमच्या आहारात साखर, सोडा, पेस्ट्री आणि कँडी यासारख्या गोष्टींचा कमीत कमी समावेश करा.

व्हिटॅमिन ए सप्लिमेंट- आपल्या शरीराला व्हिटॅमिन एची खूप गरज असते. मात्र तुम्ही व्हिटॅमिन ए सप्लिमेंट जास्त घेत असाल तर त्याचा तुमच्या यकृतावर परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन ए सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सॉफ्ट ड्रिंक्स- जे लोक जास्त सॉफ्ट ड्रिंक्स पितात त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे आजार जास्त असतात हे अभ्यासात सिद्ध झाले आहे. आपल्या आहारात सोड्याचा वापर कमी केल्यास यकृत सुरक्षित राहे. त्याऐवजी ताज्या फळांचा रस पिणे चांगले.

अल्कोहोल- दारूच्या अतिसेवनाचा यकृतावर खूप वाईट परिणाम होतो. पुरुषांनी दिवसातून दोनपेक्षा जास्त ग्लास आणि महिलांनी 1 पेक्षा जास्त ग्लास मद्य घेऊ नये.

ट्रान्स फॅट असलेले पदार्थ – पॅक केलेले आणि बेक केलेले पदार्थ ट्रान्स फॅट वाढवण्याचे काम करतात. ट्रान्स फॅटमुळे वाढलेले वजन यकृतासाठी चांगले नाही. अशी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, त्याच्या घटकांच्या यादीकडे लक्ष द्यावे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.