AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेह नको असेल तर ‘या’ सवयी टाळा!

मधुमेह एकदा एखाद्याला झाला की तो आयुष्यभर राहतो. लोक याला इतके घाबरतात की, कोणत्याही शत्रूला हा आजार होऊ नये, अशी प्रार्थना करतात. यामुळे मूत्रपिंडाचा आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ही वाढतो.

मधुमेह नको असेल तर 'या' सवयी टाळा!
avoid these habits
| Updated on: Jul 27, 2023 | 3:27 PM
Share

मुंबई: मधुमेह हा आजार जगभरातील अनेक लोकांना आपला बळी बनवत आहे. मधुमेह एकदा एखाद्याला झाला की तो आयुष्यभर राहतो. लोक याला इतके घाबरतात की, कोणत्याही शत्रूला हा आजार होऊ नये, अशी प्रार्थना करतात. यामुळे मूत्रपिंडाचा आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ही वाढतो. जर तुम्हाला मधुमेह नको असेल तर तुम्हाला दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलाव्या लागतील.

मधुमेह अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतो, परंतु हे सहसा विचित्र जीवनशैली आणि खराब खाण्याच्या सवयीमुळे होते. त्यामुळे आपल्या सवयींमध्ये काही सुधारणा करणे चांगले, जेणेकरून आपल्याला हा आजार होणार नाही.

निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसभरात किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे, तसे न केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, मधुमेह हे देखील त्यापैकीच एक आहे. कमी झोप घेतल्यास भूक नियंत्रित करणाऱ्या आणि रक्तातील ग्लुकोज टिकवून ठेवणाऱ्या हार्मोन्सचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे प्रथम लठ्ठपणा वाढेल आणि मधुमेहाचा धोका वाढेल.

आजकाल अनेक जण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्याच्या घाईत नाश्ता टाळतात, पण यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होते, अशी चूक करायला विसरू नका, अन्यथा तुम्ही लवकरच मधुमेहाचे शिकार होऊ शकता. नाश्ता न केल्यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागते, ज्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी राखली जात नाही.

रात्रीच्या जेवणानंतर काहीही खाण्याची सवय! सर्वप्रथम आपण रात्रीच्या जेवणात हेल्दी डाएट घ्यावा आणि त्यानंतर जर आपल्याला रात्री काही खाण्याची सवय असेल तर आजच सोडा. जर तुम्हाला रात्री उशीरा भूक लागली असेल तर अनहेल्दी चिप्स किंवा स्नॅक्स खाण्याऐवजी ड्रायफ्रूट्स खा. गोड गोष्टी पूर्णपणे टाळा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....