AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Foods For Long Life : ‘हे’ दोन पदार्थ सेवन केल्याने कमी होते आयुष्य, मांसाहार प्रेमींनी द्यायला हवे लक्ष!

Foods For Long Life : आजचे युग हे प्रचंड धावपळीचे आहे. अशा धावपळीच्या जमान्यात व्यक्तींना विविध आजारांची लागन होते. आजार जडल्याने आयुष्यात देखील घट होते. असे देखील काही पदार्थ असतात ज्याच्या सेवनाने तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे तुमचे आयुष्य देखील घटू शकते.

Foods For Long Life : 'हे' दोन पदार्थ सेवन केल्याने कमी होते आयुष्य, मांसाहार प्रेमींनी द्यायला हवे लक्ष!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 2:44 AM
Share

Foods For Long Life : निरोगी आणि शरीर फिट (healthy body) राहण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्याप्रकारच्या दैनंदिन क्रिया करत असतात जसे की सकाळी उठल्यावर गरम,कोमट पाणी पिण्यापासून ते रात्री जेवण केल्यानंतर फिरायला जाणे इथपर्यंत , परंतू तज्ज्ञ मंडळींच्या मते या सगळ्या गोष्टी तर आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेतच,  परंतु त्यापेक्षाही  महत्वाची गोष्टी आहे ती म्हणजे आपला आहार (Diet) आपन ज्या पद्धतीच्या आहाराचे सेवन करतो त्याचा परिणाम हा आपल्या दैनंदीन जीवनावर होतो. एखादी व्यक्ती हेल्दी डाएट घेत असेल तर त्याचे आरोग्य नेहमी चांगले राहते. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने आहार केल्याने आपल्या शरीरामध्ये अतिलठ्ठपणा सुद्धा निर्माण होतो आणि त्याचबरोबर शरीरामध्ये अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. एखाद्या आजाराची लागण झाल्यास त्यामुळे आपले आयुष्यमान कमी होऊ शकते.

नुकत्या करण्यात आलेल्या एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, जे लोक आपल्या आहारामध्ये रेड मांसाहार आणि प्रक्रिया केलेल्या मांसाहाराऐवजी  डाळ, हिरव्या पालेभाज्या, शेंगा इत्यादींचा समावेश करतात ते व्यक्ती मांसहार करणाऱ्या व्यक्तीपेक्षा दिर्घायुषी असतात. अशा व्यक्तीचे आयुष्य सरासरी मांसहार करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये 13 वर्षांनी अधिक असते. त्यामुळे शक्यतो असे पदार्थ टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.

संशोधन काय सांगते

PLOS मेडिसिन जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या रिसर्चनुसार आहारामध्ये रेड आणि प्रोसेस्ड केलेले मीट ऐवजी वेगवेगळे धान्य , कडधान्य तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगांचा समावेश केल्याने आपले वयोमान वाढण्यास मदत होते. नॉर्वेमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार ,बाहेरगावी राहणारे लोक आपल्या आहारात ड्राय फ्रूट, हिरव्या पालेभाज्या, कड धान्य यांचा अजिबात समावेश करत नाही, उलट यासारखी सर्व पदार्थ आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे, पण विदेशात राहणारे लोक आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ , मैद्याचे पदार्थ , मांसाहार इत्यादी पदार्थांचा समावेश करतात यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अति लठ्ठपणा, अतिरिक्त वजन, डायबिटीस, कॅन्सर यासारख्या समस्या उद्भवतात. या सगळ्या समस्यांमुळे आपले आयुष्य हळू हळू कमी होऊ लागते.

रिसर्च केल्यानंतर एक्सपर्ट मंडळींनी सांगितले की, विदेशात राहणाऱ्या लोकांनी जर योग्य पद्धतीचा आहार नियमितपणे फॉलो केला तर त्यांचे आयुष्य वाढू शकते तसेच यांनी आपल्या आहारामध्ये फ्रेश ताजे अन्नपदार्थ ,फळ आणि ड्रायफूट यांचा समावेश अवश्‍य करायला हवा असे केल्याने त्यांचे आयुष्य वाढू शकते. बर्गन यूनिवर्सिटी (University of Bergen) मधील लोकांना रिसर्च दरम्यान एक गोष्ट कळाली की जर वय वर्ष 60 असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये या सर्व पोषक तत्वांनी उपयुक्त असलेल्या पदार्थांचा समावेश केला तर त्यांचे जीवनमान 8.5 वर्षे वाढू शकते तसेच जर वय वर्ष 80 असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आहारामध्ये पोषक तत्त्वांनी उपयुक्त असलेले पदार्थांचा समावेश जर केला तर त्यांचे आयुष्य 3.5 वर्षापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रिसर्च मध्ये सर्व सामान्य यूरोपीय आणि अमेरिकी आहार पद्धतीची तुलना कॉम्प्युटरच्या माध्यमातून करण्यात आली होती. हा अभ्यास  वय आणि आहार पद्धती तसेच आरोग्याशी असलेल्या समस्या यावर आधारित होता. या रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले की ,जर एखाद्या 20 वर्षीय व्यक्तीने आपल्या आहारामध्ये प्रत्येक दिवशी 200 ग्रॅम कडधान्य व डाळींचे सेवन केले तर अशावेळी त्याचे वय 2.5 वर्षापर्यंत वाढू शकते.रिसर्च नुसार कडधान्य व डाळीमध्ये फॅटची मात्रा कमी असते परंतु प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि वेगवेगळे मिनरल भरपूर मात्रामध्ये आपल्याला उपलब्ध होतात म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीला आपल्या वय वाढवायचे असेल तर अशा व्यक्तीने दिवसभरातून 225 ग्रॅम डाळ, ब्राउन राईस सोबतच 25 ग्राम वेगवेगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्कीच करायला हवा.

रेड आणि प्रोसेस्ड केलेले मांसाहारचे सेवन करू नये

यासोबतच एक्सपर्ट मंडळींनी सांगितले आहे की, रेड आणि प्रोसेस्ड केलेले मांसाहार पदार्थंचे सेवन अजिबात करू नये कारण की यामध्ये फॅट आणि मिठाचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही हे पदार्थ पूर्णपणे सेवन करण्याचे बंद केल्यास तुमचे आयुष्य  4 वर्षांनी वाढू शकते. या रिसर्चचे प्रमुख लेखक आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट प्रोफेसर लार्स फडनेस (Lars Fadnes) यांच्या मते, आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार योग्य तो आहार प्रत्येकाने करायला हवा सोबतच जर तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारायचे असेल तर अशावेळी पोषक तत्त्वांनी भरपूर असलेले अन्नपदार्थांचा समावेश सुद्धा आपल्या आहारामध्ये करायला हवा.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे, तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या

तुम्हालाही ‘ही’ लक्षणे जाणवत असतील तर व्हा वेळीच सावध; असू शकतो पोटाचा अल्सर, हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

Oral Cancer : ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास कधीच होणार नाही तोंडाचा कर्करोग

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा