Oral Cancer : ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास कधीच होणार नाही तोंडाचा कर्करोग

Oral Cancer : तोंडाचा कर्करोग (Cancer) हा प्राथमिक अवस्थेत असतानाच त्याचे निदान केले जाउ शकते. परंतु बहुतेक लोक कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्याची मोठी किंमत शरीराला चुकवावी लागते.

Oral Cancer : 'या' गोष्टींची काळजी घेतल्यास कधीच होणार नाही तोंडाचा कर्करोग
तोंडाचा कर्करोग/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 11:28 AM

देशात दरवर्षी लाखो लोकांचा कर्करोगा(Cancer)मुळे मृत्यू होत असतो. कर्करोगाचेही अनेक प्रकार आहेत. त्यांच्यामध्ये तोंडाचा कर्करोग अत्यंत घातक आहे. देशात दरवर्षी या कर्करोगाचे 77 हजार रुग्ण येतात. जनजागृतीचा अभाव आणि निष्काळजीपणामुळे या आजारावर वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. याच कारणामुळे कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात अनेक प्रकरणे समोर येतात. तोंडाच्या कर्करोगाबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यानंतरच या कॅन्सरवर उपचार (Treatment) सुरू केले, तर रुग्णावर उपचार सहज करता येतात. तोंडाच्या कर्करोगाची (Oral cancer) लक्षणे कोणती आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय या लेखात जाणून घेऊ या.

…तर रुग्ण कधीही गंभीर स्थितीत पोहोचणार नाही

लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेजच्या दंतचिकित्सा विभागाचे एचओडी प्रोफेसर डॉ. परवेश मेहरा यांच्या मते, तोंडाचा कर्करोग हा प्राथमिक अवस्थेतच समजू शकतो आणि त्यावर उपचार करता येतात. जर त्याची लक्षणे वेळेवर ओळखली गेली, तर रुग्ण कधीही गंभीर स्थितीत पोहोचणार नाही. पण लोक कॅन्सरच्या लक्षणांकडे लक्ष देत नाहीत. अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी येतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कॅन्सर आढळून आल्यास रुग्णाचा जीव सहज वाचू शकतो, मात्र शेवटच्या टप्प्यात मृत्यूची शक्यता जास्त असते. हा कॅन्सर टाळण्यासाठी लोकांनी धूम्रपान सोडणे आवश्यक आहे. तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्या. तोंड आणि जीभ नियमितपणे स्वच्छ करा. तोंडाच्या आत काही बदल दिसल्यास किंवा अन्न गिळताना त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जनजागृती करणे हा उद्देश

लेडी हार्डिंग हॉस्पिटल हे तोंडाचा कर्करोग रोखण्यासाठी नवीन संसाधन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. परवेश मेहरा यांनी दिली. अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच केंद्र असेल. तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करणे, लवकर निदान करण्यावर भर देणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे हा या केंद्राचा उद्देश आहे. या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना तोंड पूर्णपणे उघडण्यास त्रास होत असल्यास किंवा डॉक्टरांना रुग्णांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसल्यास त्यांची कर्करोगाची तपासणी केली जाते. आतापर्यंत लोकांच्या तपासण्या होत नव्हत्या आणि उशीर झाल्यामुळे कॅन्सरने जीवघेणे रूप धारण केले, पण तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असल्यास प्रथम वैद्यकीय तपासणी केली जाते. गरज भासल्यास मांसाचा तुकडा तोंडातून काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. याशिवाय, रुग्णालयात एक हेल्पलाइन सुरू करणार आहे ज्यामध्ये डॉक्टर आणि इतर तज्ज्ञ लोकांच्या तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील.

कर्करोगाची ही आहेत लक्षणे –

  • तोंडात पांढरे-लालसर पुरळ किंवा फोड
  • तोंड उघडण्यात अडचण
  • जीभ बाहेर काढतांना त्रास
  • आवाजात झालेला बदल

आणखी वाचा : 

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय माहितीय का?

Skin Care Tips : निरोगी त्वचेसाठी ‘हे’ सुपरफूड वापरा आणि त्वचेवर ग्लो मिळवा!

Beauty care: चेहऱ्याच्या समस्या पटकन दूर करतं तमालपत्र! कसा करावा उपयोग? जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.