
पतंजली आयुर्वेदाने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंगची सुविधा दिली आहे. आता साबण, टुथपेस्ट,पीठ, तूपापासून आयुर्वेदिक औषधांपर्यंत सर्व प्रोडक्ट घरबसल्या मागवता येऊ शकते. कंपनीची अधिकृत वेबसाईटद्वारा ऑर्डर केल्यानंतर ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देखील दिला जात आहे. ही सुविधा खासकरुन त्या लोकांसाठी फायदेशीर आहे, जे स्टोअरपर्यंत जाऊ शकत नाही, त्यांना आता बसल्या पतंजलीची आयुर्वेदिक उत्पादने ऑनलाईन विकत घेता येणार आहे.
योग गुरु रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीने ग्राहकांच्या सुविधेला ध्यानात घेऊन अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहकांना पतंजली स्टोअरपर्यंत जायची काही गरज लागत नाही. वेबसाईट आणि मोबाईल ऐपद्वारे थेट कंपनीचे प्रोडक्ट ऑर्डर केले जाऊ शकतात.
पतंजलीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आयुर्वेदिक औषधांसह दैनंदिन जीवनात वापरता येणारी उत्पादने देखील उपलब्ध आहेत. साबण, शॅम्पू,टुथपेस्ट, बिस्कीट, तूप, आटा आणि हर्बल ज्युस सारखी हजारो उत्पादने ग्राहकांना घरबसल्या मागवता येणार आहे. कंपनी म्हणणे आहे की यामुळे छोट्या शहरे आणि ग्रामीण भागात रहाणाऱ्या लोकांना देखील शुद्ध आणि स्वदेशी प्रोडक्ट सहजपणे मिळणार आहे.
ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या अनेक उत्पादनांवर ३ ते १० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देखील मिळते. खास करुन PNB-Patanjali आणि RBL
बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यानंतर कॅशबॅकचाही फायदा मिळतो. काही निवडक उत्पादनांवर फ्री डिलीव्हरीची देखील सुविधा उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसारख्या सुविधाजनक आणि फिफायची दरात खरेदीचा लाभ घेता येणार आहे.
पतंजलीकडून ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना patanjaliayurved.net वेबसाईटवर जावे लागेल
येथे अकाऊंट बनवून वा लॉगिन करुन मनपंसद प्रोडक्टला कार्टमध्ये एड करावे
प्रोडक्टला कार्टमध्ये टाकून ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ऑर्डर कन्फर्म केली जाते
काही दिवसात हे साहित्य थेट ग्राहकाच्या घरी पोहचवले जाते.