आपल्या अशक्त मुलांना खायला द्या ‘हे’ पदार्थ, 15 दिवसांत पडेल फरक!

| Updated on: Oct 04, 2022 | 12:46 PM

तुमच्या अशक्त मुलाचे वजन न वाढण्याबद्दल तुम्हाला चिंता वाटते का ? मुलांचे वजन वाढवण्यासाठी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही अशा सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया ज्यांचा प्रभाव मुलांमध्ये 15 दिवसांत दिसू शकतो .

आपल्या अशक्त मुलांना खायला द्या हे पदार्थ, 15 दिवसांत पडेल फरक!
आपल्या अशक्त मुलांना खायला द्या 'हे' पदार्थ, 15 दिवसांत पडेल फरक!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: मुलं जर अशक्त किंवा कमी वजनाची (underweight) असतील तर ही परिस्थिती प्रत्येक पालकांसाठी (parents concern) त्रासदायक ठरू शकते. मुलांचे वजन वाढावे (weight gain) व त्यांनी तंदुरुस्त (healthy) रहावे असे सर्व पालकांना वाटते. काही सुपरफूड्सचे सेवन मुलांनी केल्यास ते हेल्दी आणि ॲक्टिव्ह (active) राहू शकतात. ते पदार्थ कोणते, याबद्दल जाणून घेऊया..

तूप

तूप हे निरोगी राहण्यासाठी वरदान मानले जाते. निरोगी फॅट्स असलेले तूप खाण्यास स्वादिष्ट असते आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंची चवही उत्तम असते. पोषक तत्वाचे भांडार असलेले तूप तुम्ही तुमच्या मुलाला दररोज सेवन करण्यास देऊ शकता. यामध्ये असलेल्या ओमेगा-३ फॅटी ॲसिडमुळे मुलांचा मेंदू तल्लख होईल.

आवळा

कमकुवत प्रतिकारशक्ती हे देखील वजन न वाढण्याचे एक कारण असू शकते. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर मुलं अनेकदा आजारी पडतात आणि कितीही चांगला आहार त्यांना दिला तरी त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.

हे सुद्धा वाचा

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर मुलांना क जीवनसत्त्वाने युक्त असलेला आवळा खाण्यास द्यावा.

दुधातून ड्रायफ्रुटस देणे

आरोग्याला हानी न पोहोचवता चांगले फॅट्स हवे असतील तर त्यासाठी ड्राय फ्रुट्स अथवा सुका मेवा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मुलांना रोज सकाळी ड्रायफ्रुट्स घातलेले दूध प्यायला द्यावे. त्यासाठी ड्रायफ्रुट्स थोडी भाजून त्यांची पूड करून ठेवावी व ती चमचाभर पूड रोज दुधात मिसळावी.

पनीर

वजन वाढीसाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांना पनीरसारखे पदार्थ खायला आवडतात. पनीर चिला, पनीर सँडविच किंवा पनीर ब्रेड बनवून तुम्ही तुमच्या मुलांना खायला देऊ शकता.