AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लसींचा तुटवडा संपणार, केंद्र सरकार आणखी 5 लसींना मंजुरी देण्याची शक्यता

नीति आयोगाचे सदस्य वी.के. पॉल यांनी डिसेंबर पर्यंत भारताला 216 कोटी डोस उपलब्ध होतील असं म्हटलं होतं. Corona Vaccine

कोरोना लसींचा तुटवडा संपणार, केंद्र सरकार आणखी 5 लसींना मंजुरी देण्याची शक्यता
| Updated on: May 18, 2021 | 1:42 PM
Share

नवी दिल्ली: भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतात दररोज दोन ते तीन लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. काही राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. देशात सध्या कोरोनाबाधित संख्या नियंत्रणात येत असली तरी रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी भारत सरकारननं सध्या तीन लसींच्या वापराला परवानगी दिलेली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक वी या तीन कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. येत्या काळात आणखी पाच लसींच्या वापरांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. (Government of India should gave permission to more Covid 19 vaccines soon for fight against the pandemic)

पुढील सहा महिन्यात 216 कोटी लसी उपलब्ध होणार

कोविड-19 मुळे भारतात आतापर्यंत 2 लाख सत्तर हजार व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं नीति आयोगाचे सदस्य वी.के. पॉल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबर पर्यंत भारताला 216 कोटी डोस उपलब्ध होतील असं म्हटलं होतं. यासाठी भारत सरकार येत्या काळात आणखी काही लसींना परवानगी देण्याची शक्यता आहे. यामध्ये परदेशातील काही आणि काही भारतीय लसींचा समावेश असू शकतो.

कोणत्या नव्या लसी उपलब्ध होणार

झायडस कॅडिला

भारतामध्ये झायडस कॅडिला ची लस तयार होत आहेय केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी एक ट्विट करुन या विषयी माहिती दिली होती. झायडसच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. झायडसनं कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मंजुरी मिळाली की लगेच उत्पादनाला सुरुवात करु , असं म्हटलं आहे. झायडसद्वारे या वर्षी 5 कोटी लसी बनवू असं सागंण्यात आलं आहे.

नोवावॅक्स

अमेरिकेची कंपनी नोवावैक्‍स वॅक्सिनची निर्मिती करत आहे. त्याच कंपनीच्या फार्म्युलावर भारतात कोवावॅक्स नावाची लस तयार करण्याचं काम सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही लस लाँच होईल, असा अंदाज आहे.

बायोलॉजिकल ई वॅक्‍सिन

हैदराबादमधील कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड (BE) हे वॅक्सिन तयार करत आहे. ही वॅक्सिन सध्या फेज-3 ट्रायल मध्ये आहे. लवकरचं त्याचं उत्‍पादन सुरु होण्याची आशा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या वॅक्सिनचे ३० कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध होणार आहेत. कंपनीनं त्यांची लस सर्वात कमी किंमतीची असेल, असा दावा केला आहे.

भारत बायोटेक नोजल वॅक्सिन

ही नाकावाटे दिली जाणारी लस आहे. भारत बायोटेक या लसीची निर्मिती करत आहे. याच्या क्लिनिकल ट्रायलसाठी डीजीसीआयकडे परवानगी मागण्यात आली आहे. याच्या ट्रायल अद्याप सुरु झालेल्या नाहीत.

जेनोवा

पुणे येथील जेनोवा फार्मास्युटिकल देखील लस बनवत आहे. लवकरच जेनोवा फार्मास्युटिकलला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, चार लाखांहून अधिक डिस्चार्ज, मृतांचा आकडा मात्र 4300 च्या पार

Maharashtra Corona Vaccine | कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र अग्रेसर, 2 कोटींचा टप्पा पार

Government of India should gave permission to more Covid 19 vaccines soon for fight against the pandemic

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.