AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : संधिवात रुग्णांसाठी ‘ग्रीन-टी’ आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या, फायदेशीर असणारे इतर घरगुती उपाय !

सांधेदुखीच्या वाढत्या समस्यांसाठी सदोष जीवनशैली हे एक प्रमुख कारण म्हणून पाहिले जाते. विशेषत: वाढती शारीरिक निष्क्रियता आणि आहारातील गडबड यामुळे तरुणांमध्ये सांधेदुखीचा त्रासही दिसून येत आहे. सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी तज्ञ काही घरगुती उपाय प्रभावी मानतात. जाणून घ्या, सांधेदुखीवरील घरगुती उपाय.

Health Tips : संधिवात रुग्णांसाठी ‘ग्रीन-टी’ आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या, फायदेशीर असणारे इतर घरगुती उपाय !
संधीवात
| Updated on: Sep 04, 2022 | 7:50 PM
Share

मुंबई : संधिवात, म्हणजेच सांधेदुखी (joint pain) ही हाडांची झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आहे. आकडेवारीनुसार, देशातील 180 दशलक्ष (18 कोटी) पेक्षा जास्त लोक या वेदनादायक स्थितीसह जगत आहेत. मधुमेह, एड्स आणि कॅन्सर यांसारख्या अनेक गंभीर आजारांपेक्षा त्याची व्याप्ती खूप जास्त असल्याचे काही अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सुमारे 14% भारतीय लोकांना दरवर्षी सांधेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो. सांधे सुजणे आणि दुखणे या समस्येमुळे उठणे आणि धावणे यासारख्या सामान्य दैनंदिन हालचाली करणे, तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करणे कठीण होऊ शकते. दुर्दैवाने, आता ही समस्या तरुणांमध्येही वाढताना दिसत आहे. विशेषत: वाढती शारीरिक निष्क्रियता (Physical inactivity) आणि आहारातील गडबड यामुळे तरुणांमध्ये सांधेदुखीचा त्रासही दिसून येत आहे. सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी तज्ञ काही घरगुती उपाय (Home remedies) प्रभावी मानतात. जाणून घ्या, सांधेदुखीवरील घरगुती उपाय.

ग्रीन टीमुळे फायदा होतो

संधिवात समस्या दूर करण्यासाठी ग्रीन-टी चे सेवन फायदेशीर असल्याचे संशोधकांना आढळले आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट संधिवातामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात असे मानले जाते. शास्त्रज्ञांना पुरावे मिळाले आहेत की ग्रीन-टी अर्क किंवा त्यात आढळणारा विशिष्ट घटक संधिवात लक्षणे कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. संधिवातासह इतर अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्यांमध्ये ग्रीन-टी चे सेवन देखील फायदेशीर ठरू शकते.

हळद आहे, एक आयुर्वेदिक औषध

हळदीचा उपयोग वेदनाशामक म्हणून वर्षानुवर्षे केला जातो. त्याचा मुख्य घटक, कर्क्युमिन, दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचे ओळखले जाते. पारंपारिक आयुर्वेदिक आणि चिनी औषधांमध्ये हळदीचा वापर सांधेदुखीच्या वेदना आणि जळजळांवर देखील फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. हळदीचे सेवन किंवा हळद लावल्याने सांधेदुखीची लक्षणे कमी होण्यास मदत होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

दुखण्यासह सूज आल्यास कोरफडीचा गर फायदेशीर

संधिवात समस्येपासून मुक्त होण्यासाठी पर्यायी औषधांमध्ये कोरफड ही सर्वात सामान्यपणे वापरली जाणारी एक औषधी वनस्पती आहे. कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. संधिवात वेदनांसाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्ज (NSAIDs) औषधांवर याचे कोणतेही ज्ञात दुष्परिणाम नाहीत. वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी कोरफडीचे सेवन केले जाऊ शकते.

आल्याचे दाहक-विरोधी गुणधर्म

जेवणाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. त्यात अनेक औषधी फायदेही दिसून आले आहेत. अभ्यासात असे आढळून आले आहे की, आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे ऑस्टियोआर्थरायटिस आणि सांधे-स्नायू वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आहारात आल्याचा समावेश केल्यास अशा समस्यांपासून आराम मिळू शकतो.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...