AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care: तुमचेही केस खूप पातळ आणि विरळ आहेत काय? केसांच्या पोषणासाठी या नैसर्गिक गोष्टींचा करा वापर !

अनेकदा केस कमकुवत झाल्यामुळे केसांमध्ये खूप हलकेपणा येतो. जर तुम्हाला तुमच्या केसांच्या पातळपणाबद्दल काळजी वाटत असेल तर, काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. जाणून घ्या, केसांच्या पोषणासाठी नैसर्गिक घटक.

Hair Care: तुमचेही केस खूप पातळ आणि विरळ आहेत काय? केसांच्या पोषणासाठी या नैसर्गिक गोष्टींचा करा वापर !
तुमचेही केस खूप पातळ आणि विरळ आहेत काय?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Sep 13, 2022 | 6:28 PM
Share

केस गळण्याची अनेक कारणे आहेत. पण ते रोखण्यासाठी नेमके उपाय आपल्याला सापडत नाहीत.पण केस गळणे (hair loss) थांबवण्यासाठी फक्त तेल आणि शॅम्पूवर अवलंबून राहणे योग्य नाही. अनेकदा केस कमकुवत झाल्यामुळे केसांमध्ये खूप हलकेपणा येतो. यावर मात करण्यासाठी मुली हेअर कटिंग करतात. जेणेकरून काही प्रमाणात केसांमध्ये दाटी दिसेल. पण ही युक्तीही फार काळ काम करत नाही. जर तुम्हाला तुमच्या केसांच्या हलकेपणा आणि पातळपणाबद्दल काळजी वाटत असेल तर, काही नैसर्गिक गोष्टींसह (With natural things) घरगुती उपायांचाही वापर करता येतो.

बाजारात अनेक रासायनिक उत्पादने उपलब्ध आहेत. ते केसांच्या समस्या दूर करतात. परंतु, नैसर्गिक उत्पादने वापरण्यास सुरक्षित असतात. त्यांचे दुष्परिणाम कमी (Fewer side effects) दिसतात. जाणून घेऊया कोणत्या नैसर्गिक गोष्टी केसांचे पोषण करण्यास मदत करतात.

आवळा, रिठा, शिकेकाई

अनादी काळापासून या तीन गोष्टी केस धुण्यासाठी शॅम्पूच्या स्वरूपात वापरल्या जात आहेत. आवळा, रिठा आणि शिकेकाई मिसळून केस धुतल्यास केस चमकदार आणि मुलायम होतात. या तिन्हींचे मिश्रण करून शॅम्पू बनवण्यासाठी आवळा, रिठा आणि शिकेकाई समान प्रमाणात पाण्यात उकळवा. नंतर बारीक करून घ्या. ही पेस्ट केसांना लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या. ही पेस्ट केसांना पोषण देते. त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात.

कोरफडीचा गर

कोरफड मॉइश्चरायझेशन तसेच केसांना मजबूत करते. केस कोरडे आणि तुटल्यास. केसांच्या मुळांवर कोरफडीचा गर चोळून लावावा. त्यानंतर तासाभराने केस धुवा. हे केस मजबूत करते. केसांची पोत सुधारते.

ब्राह्मी

ब्राह्मी केसांसाठी औषधाप्रमाणे काम करते. जास्त ताणामुळे केस गळत असतील तर केसांना ब्राह्मी लावा. कोंडा, खाज सुटणे आणि फुटणे या समस्यांपासून सुटका मिळते. केस पातळ होण्याचा त्रास होत असेल तर ब्राह्मी लावा. ब्राह्मीची पाने कडुलिंबाच्या पानांसोबत बारीक करून आवळा पावडरमध्ये मिसळा. ते तुमच्या केसांवर चोळा. साधारण तासाभरानंतर केस धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा ते लावल्याने केसांमधील फरक काही दिवसात दिसून येईल.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?