Health tips: शरीर पोखरून टाकणारे आजार..देतात अशी सहा संकेत! लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भोगावे लागतील गंभीर दुष्परिणाम

| Updated on: Jul 30, 2022 | 3:29 PM

तुमच्या प्रत्येक अवयवाला नकळत पोखरून टाकणारे आजार, गंभीर रूप धारण करण्यापूर्वी काही संकेत देतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे, मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असते. जाणून घ्या, कोणते आहेत हे संकेत.

Health tips: शरीर पोखरून टाकणारे आजार..देतात अशी सहा संकेत! लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भोगावे लागतील गंभीर दुष्परिणाम
Follow us on

मुंबई : जगात सध्या अनेक प्रकारचे आजार आहेत आणि गेल्या काही वर्षांत कोरोना व्हायरससह अनेक नव-नवीन दुर्धर (Newly sick) आजार तुमचे दार ठोठावत आहेत. साहजिकच कोणत्याही आजाराची लक्षणे वेळीच दिसली तर योग्य उपचार मिळू शकतात. मात्र, काही आजारांची लक्षणे (Symptoms of diseases) शेवटच्या क्षणी आढळून येतात. निर्सगतः एक चांगली गोष्ट अशी आहे की, मानवी शरीर अनेक रोगाबद्दल आधीच चेतावणी देते. जर तुम्ही हे संकेत समजून घेतले तर तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. मात्र, लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला नंतर कोणत्याही गंभीर समस्येचा सामना करायचा नसेल, तर तुमच्या शरीराद्वारे जी काही संकेत (Some hints) आणि लक्षणे जाणवत आहेत त्यांना सहज घेऊ नका. जाणून घ्या, अशाच काही समस्यांबद्दल ज्याबाबत तुमचे शरीर तुम्हाला आधीच सिग्नल देते. त्यांना गांभीर्याने घ्या आणि डॉक्टरांचा सल्ल्याने वेळीच उपचार पूर्ण करा.

कोंडा आणि केस गळणे

एका अभ्यासानुसार, कोंडा आणि केस गळणे हे जीवनसत्त्व आणि पौष्टिकतेच्या कमतरतेची लक्षण असू शकते. झिंक, बी2, बी3, बी6 आणि बी7 जीवनसत्त्वे तसेच लोहाच्या कमतरतेमुळे असे विकार होऊ शकतात.

डोळ्यांचा कोरडेपणा

आजारपण, वृद्धत्व किंवा विशिष्ट औषधांमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो, यामुळे डोळ्यांत आग, जळजळ आणि नुकसान होऊ शकते. मात्र हे Sjogren’s syndrome चे लक्षण देखील असू शकते. या समस्येत अनेकदा तोंड कोरडे पडते.

हे सुद्धा वाचा

त्वचेवर पुरळ उठणे

मेयो क्लिनिकच्या मते, त्वचेवर पुरळ येणे विविध कारणांमुळे होऊ शकते, ज्यात संसर्ग, उष्णता, ऍलर्जी, रोगप्रतिकारक प्रणालीचे विकार आणि औषधे यांचा समावेश आहे. सामान्यतः, लाल आणि खाज सुटणे हे एक्जिमाचे लक्षण आहे, परंतु काहीवेळा ताप तसेच पुरळ येणे, संसर्ग होणे किंवा विशिष्ट वनस्पतींना स्पर्श करणे देखील होऊ शकते.

जिभेवर पांढरे डाग

निरोगी जिभेला सहसा गुलाबी रंगाची छटा असते. तुमच्या जिभेवर पांढरे ठिपके दिसले, तर ते ओरल थ्रशचे लक्षण असू शकते, जे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये खूप सामान्य आहे.

सुजलेले घोटे

घोट्यावर सूज येणे हे गर्भधारणेचे एक सामान्य लक्षण आहे, परंतु जर तुम्ही बाळाची अपेक्षा करत नसाल तर याचा अर्थ खराब रक्ताभिसरण, हृदयाच्या समस्या किंवा थायरॉईड ग्रंथी कमी होऊ शकतात. या लक्षणाचे एक कमी गंभीर कारण म्हणजे जास्त मीठ खाणे, ज्यामुळे पाणी टिकून राहते.

सुरकुतलेले हात आणि बोटे

शरीरावर सुरकुत्या पडणे हे वृद्धत्वाचे सामान्य लक्षण आहे. बराच वेळ पाण्यात राहिल्यानंतरही बोटांचे ठसे सुरकुत्यांसारखे दिसू शकतात. परंतु जेव्हा हात अधिक सुरकुत्या दिसू लागतात, तेव्हा शरीराच्या त्वचेची लवचिकता झपाट्याने नष्ट झाल्यामुळे होऊ शकते. हे निर्जलीकरण, खराब रक्त परिसंचरण किंवा थायरॉईड समस्यांमुळे असू शकते.