AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: टाईप 2 च्या डायबिटीस रुग्णांना त्रिफळाचे सेवन फायदेशीर, मिळतात ‘हे’ लाभ

डायबिटिसच्या रुग्णाची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत चालली आहे. टाईप 2 च्या डायबिटीस रुग्णांना त्रिफळा फायदेशीर ठरत असल्याचे समोर आले आहे.

Health: टाईप 2 च्या डायबिटीस रुग्णांना त्रिफळाचे सेवन फायदेशीर, मिळतात 'हे' लाभ
मधुमेह Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 12, 2022 | 11:03 PM
Share

मुंबई, जीवनशैलीतील आजारांच्या यादीत मधुमेहाच्या (diabetes) रुग्णांची संख्या वाढत आहे. WHO च्या म्हणण्यानुसार भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मधुमेहाशी संबंधित जास्तीतजास्त माहिती मिळवून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. जर तुम्ही मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असाल तर त्रिफळा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (IJAM) ने प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालात टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्रिफळा फायदेशीर आहे.

टाइप 2 मधुमेहामध्ये त्रिफळाचे फायदे

आयुर्वेदिक औषधांच्या यादीत त्रिफळा समाविष्ट आहे. आवळा, बहेडा आणि हरड यांच्या एकत्रित मिश्रणाला त्रिफळा म्हणतात. सोप्या शब्दात समजून घेतल्यास त्रिफळा चूर्ण हे आवळा, बहेडा आणि हरड यांचे मिश्रण आहे आणि म्हणूनच त्याला त्रिफळा म्हणतात.

टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते कसे फायदेशीर आहे?

IJAM च्या अहवालानुसार, त्रिफळामध्ये असलेले दाहक-विरोधी तत्व, गॅलिक ॲसिड आणि फायटोकेमिकल गुणधर्म रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजच्या पातळीला संतुलित ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण हे सेवन करू शकतात.

त्रिफळा चूर्णाचे सेवन कसे करावे?

टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळा गोळ्या घेऊ शकतात. याशिवाय  आवळा, बहेडा आणि हरड एकत्र करून पावडर तयार करू शकता. तसेच तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हर्बल किंवा इतर औषधे घ्या.

रक्तातील साखरेची पातळी बिघडण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे मधुमेहाची समस्या टाळण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करण्यासोबतच शरीराचे वजन संतुलित ठेवल्यास ही समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.