Health: डायबिटीस होण्याच्याआधी दिसून येतात ही लक्षणं, वेळेआधीच व्हा सावध!

मधुमेह ही भारतासाठी गंभीर समस्या बनली आहे. वेळेआधीच याच्या लक्षणांवर उपाय केल्यास धोका टाळता येणे शक्य आहे.

Health: डायबिटीस होण्याच्याआधी दिसून येतात ही लक्षणं, वेळेआधीच व्हा सावध!
मधुमेह Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 8:29 AM

मुंबई,  गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या वाढली आहे. चुकीची जीवनशैली (Bad Lifestyle), खाण्याच्या सवयी, अपुरी झोप आणि तणाव (Stress) यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. साखरेची पातळी वाढत असल्याचे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यांची तपासणी केली असता त्यांना अचानक मधुमेह झाल्याचे कळल्यावर अनेकांना धक्का बसतो. तुमच्या शरीरातून येणा-या सूचनांकडे लक्ष दिल्यास मधुमेहाची काही लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे वेळीच ओळखली आणि  उपचार केल्यास रक्तातील साखर वाढण्यापासून रोखता येते.

मधुमेहापूर्वीची लक्षणे

घाम येणे आणि चक्कर येणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. रक्तातील साखरेची पातळी वाढली की शरीराचे अंतर्गत तापमान असंतुलित होऊ लागते. मधुमेहामुळे शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता बिघडते. यामुळे जास्त घाम येणे किंवा खूप कमी घाम येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. घाम येणे, चक्कर येणे आणि पायाला मुंग्या येणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत.

prediabetic काय आहे?

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते परंतु मधुमेहाच्या पातळीपर्यंत पोहोचत नाही. या स्थितीला प्रीडायबेटिक म्हणतात. या अवस्थेत शरीरात अनेक बदल होतात. या लक्षणांमध्ये विशेष काही नाही. म्हणूनच अनेकांना ही लक्षणे सहज जाणवत नाहीत.

हे सुद्धा वाचा

करा हे उपाय

जर पुरुषांच्या कंबरेचा आकार 40 पेक्षा जास्त आणि महिलांच्या कंबरेचा आकार 35 पेक्षा जास्त असेल तर ते प्रीडायबेटिकचे लक्षण मानले जाते. ही लक्षणे कमी करण्यासाठी रोज अर्धा तास व्यायाम करावा. त्याचप्रमाणे उच्च फायबर आहार, कमी कॅलरीजचे सेवन, पुरेशी झोप आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.