
Which Vegetable Helps Increase Height: उंचीची वाढ होणे हे जरी आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असले तरी अनेक तज्ज्ञांच्या मते योग्य पोषण झाले तर शरीराचा संतुलित विकास होऊ शकतो. खास करुन वाढत्या वयात हाडे, सांधे आणि स्नायूंना जर मजबूत बनवायचे असेल तर काही भाज्या नियमित आहारात असायला हव्यात. चला तर काही भाज्या आणि अन्नपदार्थांच्या संदर्भात माहिती घेऊयात ज्यांच्यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते.
पालक,कोबी, तारामिराची भाजी, केल पानांची भाजी हाईट वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. यात कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे मिनरल्स आढळतात. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. यातील व्हिटामिन्स के हाडांची डेन्सिटी वाढवण्यास सहायक ठरते. जे मुलांच्या वाढीसाठी चांगले असते.
केल या भाजीला सुपरफूड मानले जाते. यात कॅल्शियम आणि व्हिटामिन्स सीचे प्रमाण जास्त असते. जे हाडांना मजबूत आणि शरीराच्या विकासाला सपोर्ट करते. तज्ज्ञांच्या मते वाढत्या वयात डाएटमध्ये याचा समावेश केला तर हाडांचा चांगला विकास होऊ शकतो.
कोबी देखील पचन यंत्रणेला मजबूत करते. ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांना चांगल्या प्रकारे शोषीत केले जाते. तर अरुगुला भाजीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांची वाढ आणि मजबूतीला मदत करतात.
रताळी व्हिटामिन्स ए ने परिपूर्ण असते. ज्यामुळे हाडांचे आरोग्यासाठी हे गरजेचे मानले जाते. याशिवाय यातील फायबर गट आरोग्यास चांगले बनवते. ज्यामुळे शरीराच्या ग्रोथशी संबंधित पोषक तत्व योग्य प्रकारे मिळतात. तुम्ही यास योग्य प्रमाणात डाएटमध्ये समाविष्ठ करु शकता.
बीन्स या चवळी, फरसबी आणि पावट्यांच्या शेंगामध्ये चांगले प्रोटीन आणि आयर्न मिळते. त्यामुळे टिश्यु ग्रोथमध्ये मदत मिळते. तर क्विनोआ ही राजगिऱ्यासारखे धान्य असून त्यातून मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांना मजबूत करते ज्यामुळे उंची वाढीत मदत मिळते. तुम्ही सर्वप्रकारच्या शेंगाचा आहारात समावेश करु शकता.
एक गोष्ट स्पष्ट आहे की निश्चित वयानंतर माणसाची उंची वाढणे शक्य होत नाही. परंतू योग्य भाज्यांमुळे सुपरडाएट मिळून हाडांना तो मजबूत करतो. त्यामुळे मुलांची उंची वाढण्यात आहार उपयोगाचा असतो. जर मुलांच्या पोषणाबद्दल तुम्हाला चिंता असेल तर त्यांच्या आहारात या भाज्यांचा पुरेपुर समावेश करा. योग्य डाएटमुळे मुलांची उंची वाढण्यास मदत मिळते.
( Disclaimer: ही माहिती रिसर्च स्टडिज आणि तज्ज्ञांच्या मतावर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय मानू नये. कोणताही आहार किंवा उपचार करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )