काय गं पाळीचा त्रास होतोय…हे घरगुती उपाय कर…तुला नक्की बरं वाटेल!
Health tips – मासिक पाळी हा महिल्यांचा जीवनातील महत्त्वपूर्ण भाग आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांनी खूप त्रास होतो. काही महिलांना पाळी येण्याच्या दोन तीन दिवसांपासून त्रास सुरु होतो. आणि पाळी सुरु झाली की हा त्रास नाहीसा होता. काही घरगुती उपाय केले तर हे मासिक पाळीचे दिवस थोडे फार का होईना सुसह्य जातील.

मुंबई : मासिक पाळीचे ते चार ते पाच दिवस महिलांसाठी फार त्रासदायक असतात. यावेळी त्यांना मानसिक आणि अनेक शारीरीक त्रास होत असतो. आज महिला घर आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका सांभाळते. मग अशावेळी हा त्रास तिला अनेक वेळा अडथळा होतो. काही महिलांना पाळी येण्यापूर्वीच त्रास व्हायला सुरुवात होते. स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे अशाप्रकारचे त्रास होतात. साधारण कोणाकोणाला हा त्रास 1-2 आठवडे होतात. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक आणि शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात. काही जण गोळ्यांनी हे त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात पण त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे घरगुती उपाय करुन आपण हा त्रास कसा कमी करु शकतो ते पाहूयात
कोमट तेलाने मालिश
या दिवसांमध्ये कंबर, ओटीपोट दुखतं अशावेळी कोमट तेलाने मालिश केल्यास तुम्हाला आराम मिळतो. मालिश केल्याने शरीराचे काही पॉईंट्स दाबले जातात त्यामुळे शरीराच्या नसा मोकळ्या होतात आणि तुला दुखण्यातून आराम मिळतो.
गरम पाण्याचा शेक
हा तर सगळ्यात उपयुक्त उपाय आहे. गरम पाणीचा शेक हा एखाद्या पेनकिलर गोळीचं काम करतो. या दिवसात ओटीपोट आणि कंबर प्रचंड दुखत असते. अशावेळी गरम पाण्याचा शेक घेतला तर तुम्हाला खूप फायदेशीर होतो.
व्यायाम करणे
अनेक जण यादिवसात व्यायाम करत नाही. व्यायाम करा म्हणजे अगदी जीमला जा असं नाही. तर शरीराला हालचाल होईल म्हणजे चालणे, घरातली कामं करा. ज्यामुळे शरीराची हालचाल होते नसा मोकळ्या होतात आणि तुम्हाला बरं वाटतं.
व्हिटॅमिन डीयुक्त आहार घ्या
या दिवसात व्हिटॅमिन डीची शरीरात कमी होते. म्हणून अशावेळी आपल्याला कंबर आणि पोट दुखतं. त्यामुळे व्हिटॅमिन डीयुक्त आहार या दिवसात घ्यावा.
काही पदार्थ टाळा
या दिवसांमध्ये चहा, कॉफी, आणि काही शीतपेय या दिवसात टाळावीत.
या गोष्टी घ्या
हर्बल टी, ग्रीन टी, बडीशोप, दालचिनी, आलं हिरव्या भाज्या, चिकन, मासे, अक्रोड, बदाम, पपई आणि केळी खायला पाहिजे.
गरम पाण्याने आंघोळ
या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे. ज्यामुळे शरीराच्या नसा मोकळ्या होतात. अंग शेकलं जातं आणि दुखण्यापासून तुमची मुक्तता होते.
भरपूर आणि गरम पाणी प्या
या दिवसांमध्ये भरपूर आणि गरम पाणी प्यायलाने तुम्हाला खूप फायदा होता.
वरील घरगुती उपाय केल्यास तुमचे मासिक पाळीचे दिवस जरा सोपे जातील. मात्र काय एक गोष्ट लक्षात ठेवा शरीराशी निगडित गोष्टी असताना कुठलीही गोष्ट करताना तुमच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या. प्रत्येकाचा त्रास त्यांचा शरीराशी संबंधित असतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला कायम महत्त्वपूर्ण असतो.
हेही वाचा :
Stomach flu | तुमच्याही लहानग्यांना पोटाचा त्रास? स्टमक फ्लूची कारणं आणि लक्षणं
Music Therapy | ‘संगीत थेरपी’ चा अवलंब करा …. अन आनंदीदायी जीवनशैली अनुभवा
