घरच्या घरी अशा प्रकारे बनवा स्वस्त हेअर जेल, तुमचे केस होतील मुलायम व चमकदार

बरेच लोकं केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी हेअर जेलचा वापर करतात. पण तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून हेअर जेल देखील बनवू शकता. हे तुम्हाला नैसर्गिक मार्गाने तुमचे केस मऊ आणि चमकदार बनविण्यात मदत करू शकतात.

घरच्या घरी अशा प्रकारे बनवा स्वस्त हेअर जेल, तुमचे केस होतील मुलायम व चमकदार
| Edited By: | Updated on: Jan 21, 2025 | 2:58 PM

केस लांब आणि दाट करण्यासाठी लोकं नेहमी वेगवेगळे उपाय करत असतात, त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे हेअर ट्रीटमेंट आणि उपायांचा अवलंब करतात. शॅम्पू, हेअर कंडिशनर, मास्क आणि जेल सारख्या उत्पादनांचा देखील वापर करतात. अशातच इतर उपाय करण्याऐवजी तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या वस्तूं पासून हेअर जेल बनवून केसांना लावल्यास केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करू शकतात.

बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे हेअर जेल पाहायला मिळतील. याचबरोबर तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर करून घरी हेअर जेल देखील बनवू शकता जे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने निरोगी, मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.

फ्लॅक्स सीड्स

फ्लॅक्स सीड्समध्ये व्हिटॅमिन सी, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम आणि आरोग्यासाठी तसेच केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असलेले विविध पोषक असतात. फ्लॅक्स सीड्सचा वापर करून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. यासाठी तुम्हाला एका पॅनमध्ये 2 चमचे फ्लॅक्स सीड्स घालून कमी आचेवर पाणी जेलमध्ये रूपांतरित होईपर्यंत शिजवावे. त्यानंतर थंड होऊ द्या. आता ताज्या कोरफड जेल आणि नारळात मिसळा आणि शॅम्पू करण्यापूर्वी 25 ते 30 मिनिटे केसांना लावा.

काकडी आणि कोरफड

काकडी आणि कोरफडपासून तुम्ही जेल बनवू शकता. यासाठी काकडी सोलून किसून घ्यावी. नंतर २ चमचे कोरफड जेल मिसळून पेस्ट तयार करा. २० ते ३० मिनिटे केसांना लावा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून घ्या. यामुळे कोरडेपणा आणि खाज सुटणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

शिया बटर

शिया बटर केस मऊ बनविण्यात देखील मदत करू शकते. एक चमचा कोरफड जेलमध्ये एक चमचा शिया बटर मिसळून तुम्ही हेअर जेल तयार करू शकता. हे केसांना हायड्रेट करण्यासाठी आणि चमक वाढविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

चिया सीड्स

चिया बियाणे आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. चिया बियाणे थोड्या पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा. त्याचा आकार बदलल्यानंतर एका बाऊलमध्ये ठेवून त्यात २ चमचे कोरफड जेल मिसळा. जर पेस्ट खूप जाड झाली तर तुम्ही त्यात थोडे पाणी घालू पातळ करू शकता. आता हा हेअर मास्क केसांना २० ते २५ मिनिटे लावा आणि नंतर केस धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)