मेड इन इंडिया, नो साईड इफेक्ट, Covaxin रामबाण ठरणार?

भारताची स्वदेशी कोरोना लस (Corona Vaccine) कोवॅक्सिन चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये प्रभावी असल्याची माहिती समोर आली आहे.

मेड इन इंडिया, नो साईड इफेक्ट, Covaxin रामबाण ठरणार?

मुंबई : भारताची स्वदेशी कोरोना लस (Corona Vaccine) कोवॅक्सिन चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये प्रभावी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही लस ज्या स्वयंसेवकांना टोचण्यात आली त्यांच्यावर कोणताही साईड इफेक्ट दिसला नाही. याउलट लस टोचल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात रोगप्रतिकार क्षमतेत चांगली वाढ झाली (How Covaxine work).

भारत बायोटिक कंपनीच्या या लसीचं पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सप्टेंबर महिन्यातच संपन्न झालं होतं. या चाचणीचे परिणाम लगेच सार्वजनिक करण्यात आले होते. या स्वदेशी लसीकडून भारताला प्रचंड अपेक्षा आहेत (How Covaxine work).

लस कसं काम करते?

देशात ज्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे त्या प्रत्येक लसींचं वेगळं वैशिष्ट्य आहे. कोवॅक्सिन इतर कंपन्यांच्या लसींपेक्षा वेगळी आहे. कारण या लसीच्या निर्मितीसाठी आयसीएमआरनेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी या लसीचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे ही लस टोचल्यानंतर बराच वेळ व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित राहू शकणार आहे.

कोवॅक्सिन विकसित करताना त्यामध्ये Alhydroxiquim-II हे घटकदेखील टाकण्यात आलं आहे. या घटकमुळे लसीची क्षमता वाढते. लस टोचल्यानंतर शरीरात अँटीबॉडीची क्षमता वाढते. या अँटीबॉडी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवतील.

आपात्कालीन वापरासाठी लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता

भारत बायोटेक कंपनीने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे लसीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोवॅक्सिन सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होऊ शकते. एम्स रुग्णालयाच्या क्लिनिकल ट्रायलचे प्रमुख संशोधक डॉं संजय रॉय यांनी फेब्रुवारी 2020 पर्यंत लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, अशी आशा आहे, असं मत मांडलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI