
Ramdev Baba : भारतात आयुर्वेदाची मोठी परंपरा आहे. काही आयुर्वेदिक वनस्पतींमुळे अनेक मोठे आजार नाहीसे होतात. बाबा रामदेव हे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांनीच आयुर्वेदातील काकडशिंगी नावाच्या वनस्पतीबद्दल सांगितले आहे. या वनस्पतीमुळे तुम्हाला झालेला सर्दी, खोकला नाहीसा होतो. तसेच तुमच्या शरीरात गरमी कायम राहते, असे रामदेव बाबा यांनी सांगितले आहे. काकडशिंगी या वनस्पतीचे हिवाळ्यात सेवन केले तर त्याचे खूप लाभ होतात, असे रामदेव बाबा यांनी सांगितले आहे.
काकडशिंगी या वनस्पतीच्या पावडरचे सेवन केल्यावर शरीराला अनेक मोठे फायदे होतात. शरीर आतून मजबूत होते. तसेच कोणत्याही ऋतुमध्ये शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. रामदेव बाबा यांच्या मतानुसार काकडशिंगी या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदात अगोदरपासूनच या वनस्पतीचा उपयोग केला जातो. खोकला, दमा, ताप-सर्दी, फुप्फुसाशी संंबंधित आजार यावर उपचार म्हणून काकडशिंगी ही वनस्पती खूप लाभदायी ठरते, असे रामदेव बाबा यांचे मत आहे. ही वनस्पती दिसायला तपकिरी आणि लालसर असते. या वनस्पतीला सुकवून तिचा औषधी म्हणून वापर करता येतो. ही वनस्पती शरीराला उब देते. शरीरा गरम राहतो. म्हणून हिवाळ्यात या वनस्पतीचे पावडर खाल्ल्यास लाभदायक असते, असे सांगितले जाते.
हिवाळ्यात अनेक लोकांचे हात-पाय थंड पडतात. अशी लक्षणं दिसत असतील तर ते रक्ताभिसरणात अडचण असल्याचे लक्षण असू शकते. अशा स्थितीत हिवाळ्यात काकडशिंगी हे औषध घेतल्यास तुमचे शरीर गरम राहतो. काकडशिंगी या वनस्पतीमुळे शरीरात ताकद राहते. त्यामुळेच या वनस्पतीचे पावडर खावे असा सल्ला रामदेव बाबा यांनी दिला आहे.
काकडशिंगी ही वनस्पती फुप्फुसाच्या आरोग्यासाठीही खूप लाभदायी असते. रामदेव बाबा यांच्या म्हणण्यानुसार या वनस्पतीमुळे फुप्फुस अधिक मजबूत होते. त्यामुळे अस्थमा, जुनाट खोकला यावर मात करण्यास मदत होते. श्वसन यंत्रणाही निरोगी राहते. एक चम्मच काकडशिंगीचे पावडर मधामध्ये घेतल्यास शरीराला खूप सारे फायदे होतात, अरे रामदेव बाबा सांगतात.
(टीप- कोणताही प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)