डबल चिनपासून सुटका करण्यासाठी करा हा व्यायाम, 15 दिवसात दिसेल फरक!

मान आणि हनुवटीमध्ये चरबी जमा झाल्यामुळे डबल हनुवटीची समस्या उद्भवते. तर डबल हनुवटीची समस्या दूर करायची असेल तर आपण काही व्यायामांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे 15 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

डबल चिनपासून सुटका करण्यासाठी करा हा व्यायाम, 15 दिवसात दिसेल फरक!
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 10:46 PM

मुंबई : सध्याच्या काळात लोक फास्टफूडवर मोठ्या प्रमाणात ताव मारताना दिसतात. त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू त्यामुळे गरमागरम भजी, वडापाव, पाणीपुरी अशा अनेक पदार्थांचा आस्वाद लोक घेतातच. तर फास्टफूड जास्त खाल्ल्यामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना डबल हनुवटीची समस्या त्रास देते. मान आणि हनुवटीमध्ये चरबी जमा झाल्यामुळे डबल हनुवटीची समस्या उद्भवते. तर डबल हनुवटीची समस्या दूर करायची असेल तर आपण काही व्यायामांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे 15 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

1. जबड्याचा व्यायाम- जर तुम्हाला डबल हनुवटीची समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी जबड्याचा व्यायाम करणं गरजेचं आहे. हा व्यायाम करण्यासाठी डोकं उजवीकडे वळवा आणि नंतर आपला खालचा जबडा पुढे सरकवत 5 ते 10 सेकंद त्या स्थितीत राहा. हा व्यायाम दिवसातून किमान 5 वेळा करत जा, ज्यामुळे तुम्हाला प्रभावी रिझल्ट मिळेल.

2. पाउट करा तुम्ही सेल्फी किंवा फोटो काढताना पाउट करतच असाल. तर आता या पाउटचा उपयोग तुम्हाला डबल हनुवटी कमी करण्यासाठी उपयोग होणार आहे. जर तुम्ही डबल हनुवटीने त्रस्त असाल तर पाउट करा. दररोज चेहरा सरळ ठेवून 7 ते 8 सेकंद पाउट करा. हा पाउट तुम्ही दिवसातून 5 ते 10 वेळा केला पाहिजे जेणेकरून डबल हनुवटीचा त्रास कमी होईल.

3. जीभ स्ट्रेच करा तुम्हाला डबल हनुवटी कमी करायची असेल तर जीभ स्ट्रेच कमी करण्याचा व्यायाम करा. यासाठी चेहरा सरळ ठेवा आणि जीभ बाहेर काढून ती नाकाकडे वाढवण्याचा प्रयत्न करा. यामुळे स्नायू ताणले जातील आणि चरबी कमी होण्यास मदत होईल.

Disclaimer : वरील दिलेली संपूर्ण माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्ठी करत नाहीत.

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.