Psoriasis Skincare : लाल डाग, खाज आणि… हिवाळ्यात वाढू शकतो सोरायसिस; ‘या’ टिप्स देतील आराम

थंडी वाढल्यावर वातावरणातील आर्द्रता वाढते ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. हिवाळ्यात तुमच्या चेहऱ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी त्वचेसाठी चेहरा मॉइश्चरायझ ठेवणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात सोरायसिसच्या रुग्णांसाठी अत्यंत कठिण असतो. हिवाळ्या सोरायसिसच्या रुग्णांनी त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया सोरायसिसच्या रुग्णांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी.

Psoriasis Skincare : लाल डाग, खाज आणि... हिवाळ्यात वाढू शकतो सोरायसिस; या टिप्स देतील आराम
Psoriasis skincare
| Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 7:29 AM

हिवाळ्यात तुमच्या आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे तुमची त्वचा आणि निस्तेज दिसू लागते. त्वचा जास्त प्रमाणात ड्राय झाल्यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. हिवाळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे सोरायसिस असलेल्या लोकांना. सोरायसिस असलेल्या लोकांनी त्यांच्या त्वचेची हिवाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजेल. अनेकांना दिवसातून ३ ते ४ वेळा चेहरा धुण्याची सवय असते. परंतु सतत चेहरा धुतल्यामुळे तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी पडते.

हिवाळ्यात थंड हवेमुळे तुमची त्वचा रफ होते आणि त्वचेशी संबंधीत समस्या निर्माण होतात. हिवळ्यात त्वचेची काळजी नाही घेतल्यामुळे तुमची त्वचा काळी पडू लागगते आणि पिंपल्स मुरुम सारख्या समस्या उद्भवतात. तुमच्या चेहऱ्याचं नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी बनते. निरोगी त्वचेसाठी तुमच्या चेहऱ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया सोरायसिस वाल्या लोकांनी हिवाळ्यात त्यांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी.

हिवाळ्यात सोरायसिस का वाढतो?

हिवाळ्यात वातावरणातील गारव्यामुळे वातावरणातील आर्द्रता कमी होते. थंडीमुळे तुमची त्वचा कोरडी होऊ लागते. त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज सुटते यामुळे सोरायसिसची समस्या उद्भवते. हिवाळ्यात तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात आणि सोरायसिसचा त्रास वाढतो. हिवाळ्यात गरम कपडे घातल्यामुळे तुम्हाला घाम येतो. घाम आल्यामुळे सोरायसिस असलेल्या लोकांना हिवाळ्या शरीरावर खाज येणे, पिंपल्सच्या समस्या आशा समस्या होतात. हिवाळ्यात सर्यप्रकाश कमी असतो ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकतो. सोरायसिस नियंत्रित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

हिवाळ्यात सोरायसिसची लक्षणे :

शरीरावर लाल डाग येणे, खाज सुटणे, शरीरावर सूज येणे आणि साधेदुखी यांच्या सारखे लक्षण दिसून येतात. हिवाळ्यात त्वचा मॉइश्चरायझ करणे अत्यंत महत्त्वाचे असते. हिवाळ्यात अंघोळीसाठी गरम पाण्याच्या ऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. सोरायसिसच्या लोकांनी तज्ञांचा सल्ला घेऊन व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या. सोरायसिसच्या लोकांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारामध्ये फळे, भाज्या आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असलेल्या पदार्थांचे सेवन करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)