AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी ‘हे’ हेअर मास्क ठरतील फायदेशीर

पावसाळ्यात आरोग्यासोबतच त्वचेची आणि केसांचीही विशेष काळजी घ्यावी लागते.कारण केसांची योग्य काळजी न घेतल्यास केस कोरडे आणि फ्रिजी होतात. त्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टी वापरून हेअर मास्क तयार करू शकता.

पावसाळ्यात कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी 'हे' हेअर मास्क ठरतील फायदेशीर
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 3:53 PM
Share

आपण प्रत्येक ऋतूत केसांची काळजी घेत असतो. पण पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या केसांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये केस गळणे, कोरडे आणि कुरळे होणे यासारख्या समस्या वाढू शकतात. कारण पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते ज्यामुळे केस कोरडे होतात. घाण आणि घामामुळे केसांचे आरोग्य देखील बिघडू शकते. हेल्थलाइनच्या मते, आर्द्रतेमुळे केस कोरडे होऊ लागतात, ज्यामुळे कुरळे केसांची समस्या उद्भवू लागते. याशिवाय जर हवामानात आर्द्रता वाढली तर कुरळे केसांची समस्या अधिक त्रास देऊ लागते.

अशा हवामानात, केसांना निरोगी, चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी, हेअर मास्क बनवून लावावे. हे घरगुती उपाय केसांना हायड्रेट करून फ्रिजी आणि कोरड्या केसांच्या समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. जर तुम्ही देखील कोरड्या आणि फ्रिजीनेस या केसांच्या समस्येने त्रस्त असाल आणि बाजारातील महागडे प्रोडक्ट केसांच्या समस्यांपासून आराम मिळत नसेल, तर तुम्ही घरगुती हेअर मास्क वापरून पाहू शकता जे तुमचे केस निरोगी आणि मजबूत बनवतील.

कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी हे हेअर मास्क वापरून पहा

दही आणि लिंबू हेअर मास्क सर्वोत्तम

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यास आणि कोंडा दूर करण्यास मदत करते. तसेच दही यामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात जे केसांना मऊ बनवण्यास मदत करतात. तसेच हा हेअर मास्क नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. दुसरीकडे, लिंबूमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. दह्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट बनवा आणि अर्धा तास केसांना लावा. यामुळे केस मऊ आणि गुळगुळीत होतील.

अंडी आणि मध केसांसाठी फायदेशीर

अंड्यामध्ये प्रथिने आणि बायोटिन असते जे केसांसाठी खूप फायदेशीर असते. ते केसांच्या वाढीस आणि मजबूत होण्यास देखील मदत करते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. मध हे एक नैसर्गिक ह्युमेक्टंट आहे जे केसांना मऊ आणि चमकदार बनविण्यास मदत करते. अंड्याचा पांढरा भाग आणि मध यांची पेस्ट बनवा. नंतर काही वेळ केसांना लावा. नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे तुमचे केस गुळगुळीत आणि मऊ होतील.

केळी आणि मधाचा मास्क केसांसाठी परिपूर्ण

केळीमध्ये असलेले पोषक घटक केसांसाठी फायदेशीर असतात आणि केळीमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात ज्यामुळे हे केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यास मदत करते. तर या हेअरमास्क मध्ये वापरले जाणारे मध हे एक नैसर्गिक ह्युमेक्टंट आहे जे केसांना मऊ आणि गुळगुळीत करण्यास मदत करते. केळी मॅश करा आणि त्यात मध टाकून पेस्ट बनवा. नंतर हा हेअर मास्क केसांना लावा आणि नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?