AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलिंगडाच्या बियांमध्ये दडला आहे खजिना! पण नेमक्या कशा पद्धतीने खाव्यात ? जाणून घ्या

watermelon seeds benefits, natural remedies, summer health tips, superfoods, watermelon benefits in marathi, कलिंगडाचे फायदे, कलिंगडाच्या बिया, आरोग्याचे उपाय, त्वचा व केसांची काळजी

कलिंगडाच्या बियांमध्ये दडला आहे खजिना! पण नेमक्या कशा पद्धतीने खाव्यात ? जाणून घ्या
Updated on: Jun 16, 2025 | 8:57 PM
Share

उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड हा प्रत्येक घरात हमखास खाल्ला जाणारा आणि थंडावा देणारा एक अत्यंत लोकप्रिय फळ आहे. मात्र कलिंगड खाताना बहुतांश लोक त्यातील बिया कचऱ्यात टाकतात. खरंतर या छोट्या बियांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असंख्य पोषक घटक दडलेले असतात. या बियांचा योग्य प्रकारे वापर केल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो आणि शरीराला भरपूर पोषण मिळू शकतं.

कलिंगडाच्या बियांमध्ये लपलेले पोषक घटक

कलिंगडाच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह (आयर्न), झिंक, हेल्दी फॅट्स, ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक शरीरातील विविध कार्यांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. विशेषतः उन्हाळ्यात शरीरातील पोषण तुटवड्याची पूर्तता यामुळे शक्य होते.

हृदयासाठी फायदेशीर

कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम व हेल्दी फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच रक्तदाबही संतुलित राहतो.

पचन सुधारते

यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते. अन्न पचण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. उन्हाळ्यात पाचन बिघडण्याची शक्यता असते, अशा वेळी या बिया लाभदायक ठरतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कलिंगडाच्या बियांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि झिंकमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं आणि शरीरातील पेशींचं नुकसान टळतं.

त्वचा व केसांसाठी फायदेशीर

या बियांमध्ये असणारे पोषक घटक त्वचेला उजळ आणि मऊ बनवतात. केसांची वाढ चांगली होते आणि केस गळती कमी होते. यातील प्रथिने व फॅटी अ‍ॅसिड्स त्वचेला आतून पोषण देतात.

ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत

कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी याचा योग्य प्रकारे वापर फायदेशीर ठरतो.

कधी आणि कसे खाव्यात कलिंगडाच्या बिया?

या बियांना अनेक प्रकारांनी खाल्लं जाऊ शकतं:

1. भाजून खा: थोड्या बिया तव्यावर भाजून नाश्त्यासाठी खाव्यात. यामुळे चवही चांगली लागते.

2. पावडर बनवा: बिया भाजून त्याची पावडर करून स्मूदी, दुधात किंवा सूपमध्ये मिसळून वापरता येते.

योग्य वेळ कोणता?

कलिंगडाच्या बिया सकाळी किंवा दुपारी खाल्ल्यास शरीराला अधिक फायदा होतो. रात्री फार जास्त प्रमाणात खाणं टाळावं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.