AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Headache in winter: हिवाळ्यातच वारंवार डोकेदुखी का होतेय? घरच्या घरी काय उपाय कराल?; वाचाल तर वाचाल

थंडीच्या ऋतूमध्ये काही लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो. यामागचे कारण काय व त्यापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपचार जाणून घेऊया.

Headache in winter: हिवाळ्यातच वारंवार डोकेदुखी का होतेय? घरच्या घरी काय उपाय कराल?; वाचाल तर वाचाल
| Updated on: Nov 21, 2022 | 1:59 PM
Share

नवी दिल्ली – आजकाल डोकेदुखीची समस्या खूप कॉमन झाली आहे. त्यामागे शेकडो कारणं असू शकतात. कोणाचं कामाच्या ताणामुळे डोकं दुखतं, तर कोणाला डोळ्यांच्या त्रासामुळे डोकेदुखी सुरू होते. थंड हवामान हेदेखील डोकेदुखीचे कारण असू शकते. हिवाळा (winter) सुरू झाला की काही लोकांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामावरही परिणाम होतो. पण या समस्येवर घरच्या घरीही उपचार (home remedies for headache) करता येतात. मात्र ते करण्यापूर्वी यामागचे कारण (Cause of headache in winter) जाणून घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात वारंवार डोकं दुखण्याचे कारण काय ?

काही लोकांना हिवाळ्यात डोकेदुखीचा जास्त त्रास होतो, असे दिसून आले आहे. याबाबतीत तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की थंडीच्या दिवसात डोक्यासह शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात, त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होते. डोक्यामध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे डोकेदुखी सुरू होते. थंड वारा वाहू लागल्यानंतर असे होते. थंडीत डोकेदुखी वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे थंडीच्या दिवसात आपण पाणी कमी पितो. डिहायड्रेशनमुळेही डोकेदुखी उद्भवू शकते.

पुदीन्याच्या पानांचा करा वापर

जर तुम्ही हिवाळ्यात वारंवार झालेल्या डोकेदुखीमुळे त्रासला असाल तर पुदिन्याच्या पानांनी त्यावर उपचार करता येतात. पुदिना तेल डोकेदुखीसाठी प्रभावी मानले गेले आहे, त्याचप्रमाणे पुदिन्याच्या पानेही उपयुक्त ठरू शकतात. पुदिन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल नावाचे ॲक्टिव्ह (सक्रिय) कंपाऊंड असते, जे डोकेदुखीवर उपचार करण्यास मदत करू शकते.

कसा करावा वापर ? डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी पुदिन्याची पाने वापरणे अगदी सोपे आहे.

– पुदिन्याची ताजी 5-6 पाने घेऊन ती स्वच्छ धुवावी. – त्यानंतर ती मिक्सरमधून बारीक करून घ्यावीत. – आता ती एका स्वच्छ कापडात घालून त्याचा रस गाळून घ्यावा. – आता कापसाचे छोटे बोळे घेऊन पुदिन्याच्या पानांचा रस आपल्या कपाळावर नीट लावावा. – थोड्या वेळाने तो रस पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. – तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर दिवसातून 2-3 वेळा हा रस कपाळावर लावावा.

डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे मात्र तुम्हाला खूप वेदना जास्त असेल आणि घरगुती उपचारांच्या मदतीनेही बरे वाटत नसेल तर एकडा डॉक्टरांना दाखवावे. त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधे घ्यावीत.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला