तुम्ही ही फ्रीजमध्ये अंडी ठेवत असाल तर सावधान, जाणून घ्या काय आहेत तोटे
रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली अंडी खाण्यास सुरक्षित आहेत का? फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी तुमच्या आरोग्यासाठी बाहेर ठेवलेल्या अंड्यांइतकीच फायदेशीर आहेत का? उत्तर कदाचित बहुतेक लोकांना निराश करेल. अंडी खाणे तुम्हाला ही आवडत असेल पण त्याबद्दल योग्य माहिती तुम्हाला माहिती हवी.

मुंबई : रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली अंडी खाण्यास सुरक्षित आहेत का? ‘रविवार असो की सोमवार अनेकांना अंडी खाणे खूप आवडते. अंड्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. पण फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात का? बाहेर ठेवलेल्या अंड्यांइतकीच फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी फ्रेश असतात का? याचे उत्तर कदाचित बहुतेक लोकांना निराश करेल. चला जाणून घेऊया रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली अंडी का खाऊ नयेत. फ्रीजमध्ये अंडी ठेवल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते?
फ्रीजमध्ये अंडी ठेवण्याचे तोटे
- अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते सुरक्षित राहतात असं अनेकांना वाटतं पण तसं नाही. अंड्यातील प्रथिने, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने नष्ट होतात.
- हिवाळ्यात अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण फ्रीजमध्ये ठेवलेली अंड्यांतून पोषणतत्व निघून जातात.
- अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास कमी तापमानामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. सोबतच त्यांची मूळ चवही नष्ट होते.
- साल्मोनेला बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी अंडी योग्य तापमानात साठवून ठेवावीत. साल्मोनेला बॅक्टेरिया अंडी बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही दूषित करू शकतात. अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यावरील बॅक्टेरिया देखील वाढू शकतात. अशा स्थितीत ते अंड्याच्या आतही शिरण्याची शक्यता असते.
- रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली अंडी उकळली की, बहुतेक अंडी लगेच फुटतात. त्यामुळे फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर जर अंडे उकळायचे असेल तर आधी ते खोलीत काही वेळ उघडे ठेवा जेणेकरून त्याचे तापमान सामान्य होईल आणि मगच ते उकळण्यासाठी ठेवा.
- अनेक वेळा अंड्याच्या वरच्या भागावर घाण राहिली तर ती फ्रीजमधील इतर गोष्टींनाही संक्रमित करू शकते.
सल्ला : तुम्हाला रोज अंडी खाण्याची आवड असेल तर अनेक दिवसांपासून ठेवलेली अंडी न खाण्याचा प्रयत्न करा. ताजे अंडीच खरेदी करा.
