Refined Oil for Health: रिफाइंड तेलाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक, रोज करा केवळ ‘ एवढाच ‘ वापर

तेलाचा वापर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नव्हे तर शरीरासाठीही आवश्यक असतो. ब्रेकफास्ट, दुपार व रात्रीच्या जेवणातील पदार्थ हे बहुतांश वेळा तेलाचा वापर करूनच तयार केलेले असतात.

Refined Oil for Health: रिफाइंड तेलाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक, रोज करा केवळ  एवढाच  वापर
रिफाइंड तेलाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक
| Edited By: | Updated on: Sep 15, 2022 | 6:10 PM

चाट, भजी, पुरी आणि तळलेले मसालेदार (fried items) पदार्थ खायला खूप चविष्ट लागतात. मात्र त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब , हृदय आणि यकृताच्या विकारांचा (health problems) धोका वाढतो. एका निश्चित प्रमाणात वापरण्यात आलेले तेल (oil) हे केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर शरीरासाठीही आवश्यक मानले जाते. ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात खाल्लेले बहुतेक पदार्थ हे तेलाच्या मदतीने तयार केले जातात.

स्वयंपाकाच्या तेलात केवळ आवश्यक पोषक तत्वेच नसतात, तर ते चरबीदेखील (फॅट्स) (fats) मोठ्या प्रमाणात असतात. याच कारणामुळे आहारातील तेलाचे प्रमाण नियंत्रित केले पाहिजे. विशेषत: जर आपण रिफाईंड तेल वापरत असाल तर त्याच्या प्रमाणात लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. एका दिवसात किती रिफाइन्ड तेल वापरणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, हे जाणून घेऊया .

रिफाइंड तेलाचा किती वापर योग्य ?

निरोगी शरीर हवे असेल तर त्यासाठी तेल खूप महत्वाचे ठरते, त्वचा, केस आणि हाडे निरोगी ठेवण्यास तेल मदत करते. Harjindgi.com च्या नुसार, निरोगी शरीरासाठी एका दिवसात 3 ते 4 चमचे रिफाइंड तेलाचे सेवन करता येऊ शकते.

दिवसाला 20 ग्रॅमपेक्षा जास्त तेल वापरल्यास ते शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. आरोग्याची कोणत्याही प्रकारची समस्या किंवा आजार असल्यास तेलाचे प्रमाण कमी करता येते. 2 मोठे चमचे तेलातून आवश्यक पोषक द्रव्ये देखील शरीराला मिळू शकतात.

तेलाचा वापर असा करावा कमी

– तळलेल्या पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करावे.

– एखादी भाजी बनवताना केवळ एक ते दोन चमचे तेल वापरावे.

– भाजलेले किंवा वाफवलेले अन्न पदार्थ खावेत.

– सॅलॅडची चव वाढवण्यासाठी वरतून तेलाचे ड्रेसिंग करू नये.

– पोळी अथवा फुलक्यांवर तूप लावू नये.

– स्वयंपाकासाठी योग्य तेलाची निवड करावी.