Health : एकाच ग्लास किंवा बॉटलने पाणी पित असाल तर सावधान, आरोग्यासाठी भयंकर हानिकारक
एकाच ग्लासने किंवा बॉटलने जास्त वेळा पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरात अनेक गंभीर आजार होतात. त्यामुळे कधीही एकाच ग्लासने जास्त वेळा पाणी पिणं टाळा. तर आता आपण एकाच भांड्याने पाणी पिल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

मुंबई : पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं. डॉक्टर देखील प्रत्येकाला जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी पिल्यामुळे आपलं शरीर दिवसभर हायड्रेट राहते आणि निरोगी राहते. त्यामुळे पाणी पिणं खूप गरजेचं असतं. तसंच जास्तीत जास्त पाणी पिल्यामुळे आपलं अनेक धोकादायक आजारांपासून संरक्षण होतं. तर आपण घरी असलो की एकाच ग्लासने अनेक वेळा पाणी पितो किंवा बाहेर ऑफिस, कॉलेजला जातानाही आपण एकाच बॉटलने भरपूर वेळा पाणी पितो.
एकाच ग्लासने अनेक वेळा पाणी पिल्यामुळे आपल्या पोटात संसर्गजन्य विषाणू जातात. कारण एकाच ग्लासने अनेकदा पाणी पिल्यामुळे ग्लासच्या वरच्या भागावर संसर्गजन्य विषाणू जमा होतात. त्यामुळे त्या ग्लासने सारखं पाणी पिल्यामुळे ते विषाणू आपल्या पोटात जातात आणि आपल्याला उलट्या, जुलाब अशा अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कधीही एकाच ग्लासने अनेकवेळा पाणी पिऊ नका.
कधीही ग्लासने पाणी पिताना तो ग्लास साबणाने स्वच्छ धुवून घ्या. तसंच महत्त्वाचं म्हणजे ग्लास धुताना त्याच्या वरचा भाग घासून नीट धुतला पाहिजे. कारण आपण ग्लासचा वरचा भाग आपल्या ओठांना लावून पाणी पितो. त्यामुळे ग्लासच्या वरच्या भागावर विषाणू चिकटलेले असतात ते आपल्या पोटात जाऊ नये म्हणून तो भाग नीट धुणं गरजेचं आहे.
नेहमी तुमच्या पाण्याची बाटली, ग्लास आणि घरात वापरत असलेला पाण्याच जग, पाणी भरून ठेवायची भांडी स्वच्छ धुवून ठेवा. तसंच तुमची ही सर्व भांडी एका स्वच्छ जागी ठेवा जेणेकरून त्यात विषाणू जाणार नाहीत.
आपण सगळे नेहमी एकाच ग्लास, बॉटलनं पाणी पितो. पण हे आळशीपणाचं कारण नसून आपल्याला माहितीचा अभाव आहे. पण आजपासून एकाच भांड्याने पाणी पिणं टाळा. कारण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. तसंच महत्त्वाचं म्हणजे आपण एकदा वापरलेला ग्लास जरी वरून स्वच्छ दिसत असला तरी तो आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो.