उन्हाळ्यात उपलब्ध असणारे, दृष्टी वाढवणारे पदार्थ!

दृष्टी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे उन्हाळ्यातील काही पदार्थांचा आहारात समावेश अवश्य करावा. उन्हाळ्यात कोणत्या गोष्टींचे सेवन तुम्ही दृष्टी वाढविण्यासाठी करायला हवे वाचा.

उन्हाळ्यात उपलब्ध असणारे, दृष्टी वाढवणारे पदार्थ!
Increase eyesight
| Updated on: May 23, 2023 | 1:57 PM

मुंबई: आजच्या काळात लहान वयातच लोकांची दृष्टी कमकुवत होते. कारण आजच्या काळात लोक आपला बराचसा वेळ लॅपटॉप आणि मोबाईलवर घालवतात. दृष्टी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे उन्हाळ्यातील काही पदार्थांचा आहारात समावेश अवश्य करावा. उन्हाळ्यात कोणत्या गोष्टींचे सेवन तुम्ही दृष्टी वाढविण्यासाठी करायला हवे वाचा.

दृष्टी वाढवणारे पदार्थ

आहारात आंबट पदार्थांचा समावेश करा

व्हिटॅमिन सी आंबट पदार्थांमध्ये आढळते. व्हिटॅमिन सी संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. आहारात आंबट गोष्टींचा समावेश केल्यास ते त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे दृष्टी वाढवण्यासाठी आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. यासाठी संत्री, द्राक्षे, पपई आणि टोमॅटो चे सेवन करावे.

टरबूज खा

उन्हाळ्यात टरबूजचे सेवन अवश्य करावे. कारण यात 90 टक्के पाणी असते जे आपल्या शरीरासाठी आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर टरबूजमध्ये व्हिटॅमिन ए देखील असते जे डोळ्यांसाठी खूप चांगले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन केल्याने दृष्टी चांगली होते, वाढते.

पालेभाज्या

पालेभाज्या फक्त हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यातही खाव्यात. पालेभाज्या खाल्ल्याने दृष्टी तेज होते आणि अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर पालेभाज्या खाल्ल्याने मोतीबिंदू वगैरे पासून बचाव होण्यास मदत होते. त्याचबरोबर दृष्टी वाढण्यासही मदत होते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)