देसी जुगाड यशस्वी ठरला… चहा, हळद आणि भारतीय आहाराने कोविडला रोखलं – ICMR
कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान, कमी लोकसंख्या असलेल्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत दाट लोकवस्ती असलेल्या भारतात मृत्यूचे प्रमाण 5-8 पट कमी होते.

नवी दिल्ली : लोह, जस्त आणि फायबरने समृद्ध भारतीय आहार, चहाचे नियमित सेवन आणि जेवणात हळदीचा वापर यामुळे देशातील कोविडची तीव्रता आणि मृत्यू कमी झाले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एप्रिलच्या आवृत्तीत प्रकाशित झालेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. कोविड-19 (Covid-19) साथीदरम्यान, कमी लोकसंख्या असलेल्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत दाट लोकवस्ती असलेल्या भारतात मृत्यूचे प्रमाण 5-8 पट कमी होते.
भारत, ब्राझील, जॉर्डन, स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबिया येथीच्या शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हा अभ्यास करून अहवाल सादर केला. या अभ्यासाचे उद्दिष्ट, पाश्चात्य आणि भारतीय लोकसंख्येतील कोविड-19 तीव्रतेतील फरक आणि मृत्यू यांच्याशी आहाराच्या सवयींचा संबंध आहे का हे तपासणे होते.
“आमचे परिणाम असं सूचित करतात की भारतीय अन्न घटक साइटोकाइन आणि कोविड -19 चे इतर तीव्रतेशी संबंधित असलेले मार्ग दडपतात आणि पाश्चात्य लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील कोविड -19 ची तीव्रता आणि मृत्यू दर कमी करण्यात त्यांची भूमिका असू शकते.” असे पश्चिम बंगालमधील इंस्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह ओमिक्स अँड अप्लाइड बायोटेक्नॉलॉजी येथील सेंटर फॉर जीनोमिक्स अँड अप्लाइड जीन टेक्नॉलॉजी आणि हरियाणातील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधील पॉलिसी सेंटर फॉर बायोमेडिकल रिसर्च येथील संशोधकांनी सांगितले.
मात्र, वर्तमानातील या निष्कर्षांना पुष्टी देण्यासाठी देण्यासाठी मोठ्या बहु-केंद्रित केस- स्टडींचा अभ्यास आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले.
भारतीय आहारातील घटक, जे रक्तातील लोह आणि जस्त यांचे कॉन्स्नट्रेशन संतुलित राखतात आणि ज्या पदार्थांमध्ये भरपूर फायबर असते, ते कोविड-19 ची तीव्रता रोखण्यात भूमिका बजावतात असे या निष्कर्षांवरून दिसून आले.
तसेच भारतीयांच्या चहाच्या नियमित सेवनामुळे हाय एचडीएल (high-density lipoprotein) ज्याला “चांगले” कोलेस्ट्रॉल असेही म्हणाता, ते राखण्यास मदत केली. चहामधील कॅटेचिन्स रक्तातील ट्रायग्लिसराइड कमी करण्यासाठी नैसर्गिक एटोरवास्टॅटिन (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्यासाठी वापरले जाणारे स्टॅटिन औषध) म्हणून देखील काम करतात.
आणि महत्त्वाचे म्हणजे, भारतीयांच्या रोजच्या जेवणात हळदीचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, असेही आढळले. हळदीतील कर्क्युमिनने SARS-CoV-2 संसर्ग आणि कोविड-19 च्या तीव्रतेशी संबंधित मार्ग आणि यंत्रणा रोखल्या असतील आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले, असे संशोधकांनी सांगितले.
