AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Childhood Cancer Day: आजही जगात लाखो मुलांचा मृत्यू कर्करोगामुळे होता, वेळीच जाणून घ्या लक्षणं , कॅन्सरही बरा होता, फक्त एवढच करा

लहान मुलांना कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. मात्र त्यावर वेळीच उपाय केला तर तो बराही होऊ शकतो. त्यामुळे गरज आहे ती, कॅन्सर बाबत जागरूक असण्याची, आणि कॅन्सरची जर लक्षणं दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची.

International Childhood Cancer Day: आजही जगात लाखो मुलांचा मृत्यू कर्करोगामुळे होता, वेळीच जाणून घ्या लक्षणं , कॅन्सरही बरा होता, फक्त एवढच करा
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 5:05 PM
Share

मुंबईः कर्करोगाविषयी (Cancer) जगातील अनेक माणसांमध्ये भीतीचे वातावरण असते, पण आता तंत्रज्ञान (Technology) विकसित झाले आहे. वैद्यक शास्रात (Medical Science) अनेक बदल झाले आहेत. तुम्ही वेळीच उपाय केला तर कॅन्सर हा रोग बरा होऊ शकणारा आहे. आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, लहान मुलांना कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. मात्र त्यावर वेळीच उपाय केला तर तो बराही होऊ शकतो. त्यामुळे गरज आहे ती, कॅन्सर बाबत जागरूक असण्याची, आणि कॅन्सरची जर लक्षणं दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची. काही जण असंही समजतात की, कॅन्सर फक्त मोठ्या माणसांनाच होतो. मात्र असं बिलकूल नाही. जगात लाखो मुलांचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होत आहे.

कॅन्सरबाबत असणारे समज गैरसमज आणि त्याबाबत असणारी जागरुकता यामुळे कॅन्समुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सराचे प्रमाण वाढत असल्याने दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय आज बाल कर्करोग निवारण दिन (International Childhood Cancer Day) पाळला जातो. तज्ज्ञांच्या मते लहान मुलांमध्ये कॅन्सरची लक्षणे (Cancer Symptoms in Children’s) तात्काळ दिसू लागतात. त्यामुळेज आज आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या तज्ज्ञांच्या मते कॅन्सरचे किती प्रकार असतात,(Types of Cancer in Children’s) आणि त्याची लक्षणे काय असतात याची माहिती देणार आहोत.

कर्करोग अनुवांशिक नाही

राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या डॉ. गौरी कपूर सांगतात की, लहान आणि मोठ्या मुलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये फरक असतो. त्यामुळे बालक आणि प्रौढ माणसांना होणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारात बदल असतात आणि त्याच्या उपचार पद्धतीमध्येही फरक असतो. लहान मुलांना ल्यूकिमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग, ब्रेन किंवा स्पाईनल कार्ड ट्यूमर, न्यूरोब्लास्टोम, विल्म्स ट्यूमर, लिंफोमा आणि रेटिनोब्लास्टोमा (डोळ्याचा कर्करोग) यांचा समावेश होतो. लहान मुलांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असले तरी, योग्य वेळी त्याविषयी माहिती मिळाली, उपाय वेळे झाले तर किमोथेरेपीपासून कर्करोग बरा होऊ शकतो. कर्करोगाविषयी लोकांमध्ये अशीही गैरसमजूत आहे की, लहान मुलांना होणारा ब्लड कॅन्सर बरा होऊ शकत नाही, मात्र तसे काही नाही असे डॉ. गौरी असं सांगतात. त्यामुळे योग्य वेळी उपाय केले तर 80 टक्के कॅन्सर हा बरा होऊ शकतो. तर दुसरा हा गैरसमज आहे की, लहान मुलांना होणार कॅन्सर हा अनुवांशिक असतो. मात्र त्यामागील सत्य हे आहे की कॅन्सर हा DNA च्या बदलामुळे होतो. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅन्सर हा कधी जात नाही.

ती कॅन्सरची सुरुवातही असू शकते

लहान मुलांना कॅन्सर असल्यास अशा मुलांमध्ये पहिल्यांदा ही लक्षणे दिसतात की, त्यांना दीर्घ काळ ताप येतो. कायम अशक्तपणा असणे, सहज कुणी काय कुठे काय केले तरी अगदी लहान जखम असली तर प्रचंड रक्त येणे, शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी गाठी येणे, त्या दुखत राहणे, डोकेदुखी मुळे उल्टी होणे, नजर कमी होणे, वजनात कमालीचे घटणे, शरीरावर लाल रंगांचे चट्टे दिसणे अशी लक्षणे दिसत असली तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजे. यापैकी कोणतीही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षणे वेगवेगळी असू शकतात आणि ती कॅन्सरची सुरुवातही असू शकते.

या गोष्टीकडे लक्ष ठेवा

कधी कधी ही सगळी लक्षणे जेव्हा लहान मुलांमध्ये दिसू लागतात त्यावेळी मुलांचे पालक जनरल फिजिशियनकजे त्याचा उपाय घेतात. उपाय घेतल्यानंतर आठवडाभर त्याच्या आरोग्यामध्ये काहीच फरक पडला नाही तर नक्कीच कॅन्सरची चाचणी करा. जेवढ्या कमी वेळेत कॅन्सरची माहिती मिळू शकेल तितक्या लवकर त्यावर उपाय करता येऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या पालकांनी कर्करोगाविषयी जागरूक राहिलं पाहिजे.

संबंधित बातम्या

हो खरयं… आता वेळ आलीयं ‘मास्क फ्री’ जगण्याची… काय आहे नेमका दावा…

रंगाबादेत दहा महिन्यात 150 कुष्ठरोगी आढळले, कोरोना काळानंतर प्रथमच सर्वेक्षण, काय आहेत कारणं?

दरवर्षी 1.75 लाख महिलांचा मृत्यू, गर्भाशयाचा कर्करोग ठरतोय ‘सायलेंट किलर’

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.