AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात नारळाचं तेल वापरणं खरंच योग्य? बहुतांश लोकांना माहित नाही या नैसर्गिक उपायाचे फायदे!

उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी व सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी नारळाचं तेल अत्यंत उपयुक्त आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स, फॅटी अ‍ॅसिड्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक त्वचेला आतून पोषण देतात. मात्र कोणत्या व्यक्तींनी कसे आणि कधी तेल लावावं ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा...

उन्हाळ्यात नारळाचं तेल वापरणं खरंच योग्य? बहुतांश लोकांना माहित नाही या नैसर्गिक उपायाचे फायदे!
| Edited By: | Updated on: Jun 16, 2025 | 2:44 PM
Share

उन्हाळा सुरु झाला की बहुतांश लोकांचे लक्ष आहार, पाणी पिणं, आणि हायड्रेशनवर अधिक असतं. पण त्याचवेळी अनेक जण त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्वचा कोरडी, डिहायड्रेटेड आणि निर्जीव दिसू लागते. अनेकांना असं वाटतं की उन्हाळ्यात तेल लावल्याने त्वचा चिकट होईल किंवा जास्त ऑयली वाटेल. विशेषतः नारळ तेलाबाबत अशी गैरसमजूत असते. पण वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे. नारळाचं तेल केवळ हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यातही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

नारळाचं तेल का आहे फायद्याचं?

नारळाच्या तेलात फॅटी अ‍ॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि सूज कमी करणारे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेला आतून पोषण देतात व कोरडेपणा दूर करतात. उन्हाळ्यात त्वचेचा ओलावा कमी होतो, त्वचा रुखरुखीत होते आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी नारळाचं तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करून ओलावा टिकवून ठेवतं.

सूर्यप्रकाशापासून रक्षण

उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकतं. UV किरणांमुळे त्वचेला डाग, सूज, जळजळ आणि कालांतराने सुरकुत्याही येऊ शकतात. नारळ तेलातील अँटीऑक्सिडंट्स या नुकसानावर मात करतात आणि त्वचेला नैसर्गिक संरक्षण देतात. त्यामुळे त्वचा तरुण आणि ताजीतवानी राहते.

सूज व जळजळ कमी करते

उन्हाळ्यात घाम, धूळ आणि उष्णतेमुळे त्वचेवर सूज येणे, खाज येणे किंवा जळजळ होण्याच्या समस्या दिसून येतात. नारळाचं तेल यावर प्रभावी उपाय ठरतं. त्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सूज व जळजळ कमी होते आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं.

रक्ताभिसरण सुधारते

नारळाचं तेल बॅक्टेरियावर नियंत्रण ठेवतं त्याचमुळे हलकं मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला उजळपणा मिळतो.

चेहऱ्यावर कसं वापरावं?

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर काही थेंब नारळ तेल घेऊन सौम्यपणे चेहऱ्यावर लावावं. हळुवार मसाज केल्याने तेल त्वचेत शोषून घेतलं जातं. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी तेल लावल्यास सकाळी त्वचा मऊ व चमकदार दिसते.

कोणते लोक सावधगिरी बाळगावी?

ज्यांची त्वचा आधीच तेलकट आहे, अ‍ॅक्ने किंवा इतर त्वचेच्या समस्या आहेत, त्यांनी नारळाचं तेल वापरण्याआधी त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. काही लोकांना यामुळे अ‍ॅलर्जी किंवा लालसरपणा येऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीला हातावर चाचणी घेणं शहाणपणाचं ठरेल.

नैसर्गिक उपाय कायम फायदेशीर!

नारळाचं तेल नैसर्गिक, स्वस्त आणि प्रभावी उपाय म्हणून उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांवर योग्य ठरतं. मात्र योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने वापरणं महत्वाचं आहे. त्याचसोबत अतीवापर केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....