AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅनिंगशी संबंधित या पाच मिथकांवर लोक ठेवतात सहज विश्वास, कोणते आहेत ते जाणून घेऊयात

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापैकी बहुतेक जण उन्हात बाहेर जाणे टाळू शकत नाहीत. मग ते ऑफिसला जाणे असो, मुलांना शाळेत सोडणे असो किंवा मॉर्निंग वॉक असो. सूर्याच्या अतिनील किरणाशी त्वचेशी थेट संपर्क येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे टॅनिंग होण्याचे हेच कारण आहे. जरी टॅनिंग ही एक सामान्य गोष्ट असली तरी टॅनिंगशी संबंधित काही मिथके म्हणजेच गैरसमज आहेत जी लोकांना खरी वाटतात. चला तर मग आजच्या लेखात आपण अशी कोणते मिथके आहेत ते जाणून घेऊयात...

टॅनिंगशी संबंधित या पाच मिथकांवर लोक ठेवतात सहज विश्वास, कोणते आहेत ते जाणून घेऊयात
| Edited By: | Updated on: Jun 14, 2025 | 2:34 PM
Share

आपण प्रत्येकजण कामा निमित्त घरा बाहेर पडतच असतो. उन्हाळ्याच्या दिवसात कामावर जाताना आपल्या सुर्यप्रकाशाचा सामना करावा लागतोच. त्यामुळे या दिवसांमध्ये आपले शरीर टॅन होते आणि टॅनिंगची समस्या निर्माण होते. मात्र सहसा काही लोकं टॅनिंगचा संबंध त्वचा काळी पडली म्हणजे टॅनिंग होणे असे समजतात. पण हे खरे नाही. जेव्हा त्वचेच्या वरच्या थरातील मेलेनिन नावाचा रंगद्रव्य, म्हणजेच एपिडर्मिस, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे प्रमाण वाढते आणि त्वचा काळी पडू लागते. लोकांना टॅनिंगची चिंता असते, परंतु त्यासंबंधी माहिती आणि समजुतीमध्येही बराच गैरसमज निर्माण झालेला आहे. जसे की टॅनिंग फक्त उन्हाळ्यात होते तर काहींना असे वाटते की ज्यांची त्वचा काळी असते त्यांना टॅनिंग होऊ शकत नाही.

टॅनिंगशी संबंधित अशी काही गैरसमज आहेत, ज्यावर लोकं नकळत विश्वास ठेवतात. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला टॅनिंगशी संबंधित त्या सामान्य मिथकांबद्दल सांगणार आहोत ज्यावर लोकं अनेकदा विश्वास ठेवतात.

1. टॅनिंग फक्त उन्हाळ्यात होते

टॅनिंग फक्त उन्हाळ्यातच होते असे नाही, तर जेव्हा तुमची त्वचा सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांच्या संपर्कात येते तेव्हा टॅनिंग होऊ शकते. जरी थंडीच्या दिवसात दुपार असली तरी ढगाळ वातावरणातही अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेपर्यंत पोहोचू शकतात.

2. काळी त्वचा असलेल्या लोकांना टॅन होत नाही

हा पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे. अतिनील किरणे प्रत्येकावर परिणाम करतात, त्यांचा त्वचेचा रंग काहीही असो. हो टॅनिंगचे परिणाम काळ्या त्वचेच्या टोनवर हळूहळू किंवा कमी दिसून येतात, परंतु याचा अर्थ असा नाही की त्वचेला नुकसान झालेले नाही. ज्यांची त्वचा काळी आहे त्यांना सुद्धा टॅन होत असते.

3. सनस्क्रीन लावल्याने 100% संरक्षण मिळते

सनस्क्रीन लावल्याने आपल्या त्वचेला सुर्याच्या यूव्ही किरणांपासून संरक्षण होते. परंतु ते टॅनिंग पूर्णपणे रोखू शकत नाही. योग्य एसपीएफ निवडणे, पुन्हा लावणे, त्वचेचा प्रकार लक्षात ठेवणे हे सर्व महत्वाचे आहे. फक्त एकदाच सनस्क्रीन लावून तुम्ही टॅन होऊ शकत नाही असे नाही.

4. लिंबू आणि बेसन टॅनिंग त्वरित काढून टाकते

लिंबू आणि बेसन सारखे घरगुती उपाय त्वचेला थोड्या काळासाठी स्वच्छ आणि फ्रेश वाटू शकतात, परंतु ते टॅनिंगच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत. याच्या जास्त वापरामुळे त्वचेची जळजळ किंवा कोरडेपणा देखील होऊ शकतो.

5. एकदा टॅनिंग काढून टाकले की, ते पुन्हा कधीही होणार नाही.

टॅनिंगची समस्या कमी झाल्यावर जर तुम्ही उन्हात सावधगिरी बाळगली नाही तर तुम्हाला पुन्हा टॅनिंग होऊ शकते. म्हणूनच हवामान कोणताही असो, घराबाहेर पडण्यापूर्वी प्रत्येक वेळी तुमच्या त्वचेचे रक्षण करणे महत्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा