AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्किन केअरमध्ये वापरले जाणारे कोरफड जेल तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते का? जाणून घ्या तज्ञांकडून

स्किन केअर जेल त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. परंतु फायद्याऐवजी कोरफड जेल अनेकांच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. तज्ञांकडून जाणून घ्या की कोरफड जेलमुळेत्वचेला काय नुकसान होऊ शकते.

स्किन केअरमध्ये वापरले जाणारे कोरफड जेल तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते का? जाणून घ्या तज्ञांकडून
Updated on: Jun 13, 2025 | 3:39 PM
Share

प्रत्येक ऋतूत त्वचा चमकदार ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. तर काही लोकं महागडे स्किन केअर प्रोडक्ट विकत घेऊन त्वचेवर लावत असतात. तर काहीजण हे घरगुती उपायांचा वापर करतात. यामध्ये कोरफड जेलचाही समावेश आहे. बरेच लोकं कोरफडीचे जेल अनेक प्रकारे वापरतात. तर या जेलमध्ये व्हिटॅमिन ई, गुलाबपाणी किंवा नारळाचे तेल टाकूल फेस पॅक बनवून याचा वापर त्वचेवर करत असतात. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि चमकदार बनण्यास मदत होते.

कोरफड जेल चेहऱ्यावरील डाग आणि पेगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. आता आपण प्रत्येकाने या जेलच्या फायद्यांविषयी खूप ऐकले असेल, परंतु कोरफड जेल ही त्वचेला नुकसान देखील पोहोचवू शकते. याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण कोरफड जेल त्वचेला कसे फायदेशीर आणि हानिकारक ठरू शकते हे तज्ञांकडून जाणून घेऊया.

त्वचेच्या काळजीसाठी कोरफडचा वापर

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की, कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते, परंतु त्याचा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापर करणे महत्त्वाचे आहे. कोरफड जेलमध्ये जीवनसत्त्वे अ, क, ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला पोषण देतात. यासोबतच त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि सूर्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यास कोरफड जेल मदत करते. एवढेच नाही तर त्वचेवर येणारे मुरुम, पुरळ, जळजळ आणि ॲलर्जीसारख्या समस्या कमी करण्यास देखील मदत करू शकते. कोरफड त्वचेची जळजळ कमी करते आणि जखमा बरे होण्याची प्रक्रिया वेगवान करते, म्हणून ते त्वचेच्या काळजीसाठी वापरले जाते.

कोरफड जेलचे दुष्परिणाम

पण प्रत्येकाच्या त्वचेच्या गरजा सारख्या नसतात. काही लोकांना कोरफडीपासून ॲलर्जी किंवा जळजळ होऊ शकते, विशेषतः जर त्वचा खूप संवेदनशील असेल. म्हणून कोणतीही नवीन स्किन केअर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. जर खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा यासारखी लक्षणे दिसली तर असे प्रोडक्ट वापरणे थांबवा. कधीकधी बाजारात उपलब्ध असलेल्या कोरफड जेलच्या प्रोडक्टमध्ये कॅमिकल किंवा परफ्यूमचा देखील वापर केला जातो. जे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. जर तुम्ही नैसर्गिक कोरफडी जेलचा वापर केला तर चांगले होईल, जसे की कोरफडीच्या पानांपासून काढलेले ताजे जेल लावणे. तुम्ही ते योग्य पद्धतीने वापरावे.

तसेच कोरफड जेल सर्वांसाठी फायदेशीर असेलच असे नाही. कोरफड हा जादूचा उपाय नाही, परंतु नियमित आणि योग्य वापराने ते त्वचा स्वच्छ, मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. परंतु जर तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि तुम्हाला आधीच त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ते वापरण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत....
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर.
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्....
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं...
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं....
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्..
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्...
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?.
राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू
राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू.
असं काय घडलं की, विद्यार्थीनींच्या अंगावरचे कपडे काढून तपासणी अन्...
असं काय घडलं की, विद्यार्थीनींच्या अंगावरचे कपडे काढून तपासणी अन्....