AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहे Ramsay Hunt Syndrome, ज्यानं जगप्रसिद्ध गायक जस्टीन बिबरच्या चेहऱ्याचा आकारच बदलला

आजारपणामुळे जस्टिन बीबरने या आठवड्यात आपले अनेक ‘शो’ रद्द केले आहेत. यात, टोरंटोमधील दोन शोज्‌चा समावेश आहे. जस्टिनने आपल्या इंस्टाग्रामवर सांगितले, की त्याला रॅमसे हंट सिंड्रोमचे निदान झाले आहे.

काय आहे Ramsay Hunt Syndrome, ज्यानं जगप्रसिद्ध गायक जस्टीन बिबरच्या चेहऱ्याचा आकारच बदलला
Image Credit source: tv9
| Edited By: sagar joshi | Updated on: Jun 11, 2022 | 12:47 PM
Share

जगभरातील तरुणाईला आपल्या आवाजाने भुरळ घालणारा पॉप सिंगर जस्टिन बीबरवर (Justin Bieber) मोठे संकट कोसळले आहे. त्याला एका विषाणूमुळे गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजाराबाबत खुद्द जस्टिननेच आपल्या इंस्टावर एक व्हिडिओ (Video) पोस्ट करुन माहिती दिली आहे. आजारपणामुळे जस्टिन बीबरने या आठवड्यात आपले अनेक ‘शो’ रद्द केले आहेत. यात, टोरंटोमधील दोन शोज्‌चा समावेश आहे. जस्टिनने आपल्या इंस्टाग्रामवर सांगितले, की त्याला रॅमसे हंट सिंड्रोमचे (Ramsay Hunt syndrome) निदान झाले आहे, हा एक विषाणू असून ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याची उजवी बाजू तात्पुरती पॅरालाइज्ड झाली आहे.

काय आहे हा आजार?

न्यू यॉर्कच्या माउंट सिनाई हेल्थ सिस्टमच्या रिसोर्सनुसार, रॅमसे हंट सिंड्रोम हा एक ‘पेनफुल रॅश’चा प्रकार आहे हा आजार बहुतेक प्रौढांमध्ये दिसून येतो. या आजारामध्ये व्हॅरिसेला झोस्टर विषाणू डोक्यातील मज्जातंतूला संक्रमित करतो व त्यामुळे हा आजार निर्माण होत असतो. हाच विषाणू कांजण्या आणि शिंगल्सलाही कारणीभूत ठरतो. क्वचित प्रसंगी मुलांमध्ये हा सिंड्रोम दिसून येतो.

रॅमसे हंट सिंड्रोम कशामुळे होतो?

व्हॅरिसेला विषाणू हा आतील कानाजवळील चेहऱ्याच्या मज्जातंतूला संक्रमित करतो, ज्यामुळे त्या भागाला सूज येते. बीबरने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये चाहत्यांना सांगितले आहे, की हा सिंड्रोम आपल्या कानाच्या मज्जातंतूवर, चेहऱ्याच्या मज्जातंतूवर हल्ला करणाऱ्या विषाणुंमुळे पसरला आहे. व त्यामुळे आपला चेहरा पॅरालाइज्ड झाला आहे.

काय आहेत लक्षणे?

न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई हेल्थ सिस्टम रिसोर्सच्या माहितीनुसार,

1. कानात तीव्र वेदना होणे.

2. कानाचा पडदा, जीभ आणि तोंडाच्या वरील भागात वेदनांसह रॅश निर्माण होणे.

3. एकीकडील ऐकण्याची क्षमता कमी होणे.

4. एखाद्या गोष्टींच्या संवेदना (व्हर्टिगो) होणे.

5. चेहऱ्याच्या एका बाजूला कमकुवतपणा निर्माण होउन त्यामुळे एक डोळा बंद करणे, खाणे, हावभाव करणे आणि चेहऱ्याची बारीक हालचाल करणे कठीण होते.

काय दिसतेय व्हिडिओत

बीबरने आपल्या इंस्टा अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात बीबरच्या आजाराची लक्षणे स्पष्ट दिसून येत आहेत. त्याला उजवा डोळा लुकलुकता येत नव्हता. बीबर चेहऱ्याच्या उजव्या बाजूला हसू शकत नाही किंवा नाक हलवू शकत नाही. त्याचे चेहर्याच्या दोन्ही बाजूंच्या हालचालींमध्ये बदल जाणवत आहेत.

रॅमसे हंट सिंड्रोमवर उपचार काय?

न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई हेल्थ सिस्टम रिसोर्सने म्हटले आहे, की स्टिरॉइड्स प्रकारातील अँटी-इंफ्लेमेंटरी औषधे सामान्यतः रॅमसे हंट सिंड्रोमवर उपचार करण्यासाठी दिली जातात. त्यासोबतच अँटीव्हायरल औषधे दिली जाऊ शकतात. एकंदरीत, लक्षणे दिसू लागल्यानंतर तीन दिवसांत उपचार सुरू केल्यास बरे होण्याची शक्यता अधिक असते. बीबरची लक्षणे कधीपासून सुरू झाली हे अद्याप कळलेले नाही. या वेळेत उपचार सुरू केल्यावर, बहुतेक लोक पूर्ण बरे होतात. उपचारांना तीन दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, पूर्ण बरे होण्याची शक्यता कमी असते. माउंट सिनाईच्या आरोग्य संसाधनानुसार, स्टिरॉइड्स घेऊनही वेदना होत राहिल्यास कधीकधी हार्ड पेनकिलर औषधांची देखील आवश्यकता असते. चेहऱ्याचे स्नायू कमकुवत असताना कॉर्नियाला दुखापत होऊ नये म्हणून काहीवेळा डोळा पॅच घालण्याची शिफारस केली जाते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार