Kidney Health : किडनीसाठी धोकादायक ठरू शकतात ‘हे’ 4 पदार्थ; त्यापासून लांब राहणेच इष्ट..

बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरात किडनीची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. किडनीच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी आपल्यात काही बदल करणे आवश्यक आहे. काही पदार्थांचे सेवन करणे किडनीसाठी धोकादायक ठरू शकते, ते टाळणेच उत्तम ठरते.

Kidney Health : किडनीसाठी धोकादायक ठरू शकतात 'हे' 4 पदार्थ; त्यापासून लांब राहणेच इष्ट..
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 1:42 PM

आपल्या शरीरात किडनी (Kidney) ही अनेक महत्वाची कामे करते. ही शरीरातील नकोसे पदार्थ, कचरा, अतिरिक्त द्रव आणि दूषित घटक काढून टाकण्यास मदत करते. मात्र बदलती जीवनशैली (Lifestyle)खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Bad food habits) किडनीचे आजार (kidney diesease) जडत असल्याचे दिसून येत आहे. जगभरात किडनीची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. किडनीची काळजी घेणे खूप गरजेचे असते. किडनीच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी आणि ती निरोगी ठेवण्यासाठी आपल्यात काही बदल करणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी किडनी खराब करण्याचे काम करीत असतात. रोजच्या आहारात काही पदार्थांचे सेवन करणे हे किडनीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे निरोगी किडनी हवी असेल तर खाली नमूद केलेल्या काही पदार्थांचे (avoid these food items) सेवन टाळावे.

प्रोसेस्ड मीट –

हे सुद्धा वाचा

प्रक्रिया केलेले मांस म्हणजेच प्रोसेस्ड मीट हे किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. त्यामध्ये सोडिअम खूप जास्त प्रमाणात असते. सोडिअमचे अतिरिक्त सेवन केल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. अभ्यासानुसार, सोडिअमचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास किडनी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे.

मेयॉनीज –

एखाद्या सॅलॅडमध्ये ड्रेसिंग म्हणून किंवा सँडविच खाताना बरेच लोक त्यात मेयॉनिजचा वापर करताना दिसतात. मात्र मेयॉनिजमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात. हे घटक किडनीसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे निरोगी किडनी हवी असेल मेयॉनिजचा वापर टाळावा. किंवा खायचेच असेल तर फॅटरहित अथवा कमी कॅलरी असलेल्या मेयॉनिजचा वापर करावा.

सोडा –

सोड्यामध्ये साखरचे प्रमाण अतिशय जास्त असते. जर आपण अधिक कॅलरीजचे सेवन करत असाल, तर त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते व त्यामुळे भविष्यात शरीराला त्रास सहन करावा लागू शकतो. अभ्यासानुसार, सोड्याचे सेवन केल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, दातांसबंधित समस्या आणि किडनीचे विकार होऊ शकतात. त्यामुळे सोडा असलेले पदार्थ, तसेच कोल्डड्रिंक यांचे सेवन करणे शक्यतो टाळावे.

डीप फ्राईड पोटॅटो –

डीप फ्राईड पोटॅटो म्हणजेच तळलेल्या बटाट्यांचे, कोणत्याही स्वरूपात सेवन करणे हे शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरते. फ्रेंच फ्राईज, तसेच चिप्स, वेफर्स यांचे सेवन कमी करा. त्याच्या सेवनामुळे वजन वाढू शकते, किडनीचे नुकसान होऊ शकते. हृदय तसेच किडनीचे आजार होण्यापासून रोखायचे असेल तर तळलेल्या पदार्थांचे सेवन खाणे टाळा.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.