Alzheimer’s Day 2022: ‘ या ‘ सवयींमुळे वाढतो अल्झायमरचा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय !

जागतिक स्तरावर ज्या आजाराची प्रकरणे वाढताना दिसत आहे, त्यापैकी अल्झायमर हा आहे. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरपैकी आहे .

Alzheimer’s Day 2022: ' या ' सवयींमुळे वाढतो अल्झायमरचा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय !
' या ' सवयींमुळे वाढतो अल्झायमरचा धोका
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 3:14 PM

जागतिक स्तरावर ज्या आजाराची प्रकरणे वाढताना दिसत आहे, त्यापैकी अल्झायमर (Alzheimer) हा आहे. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरपैकी (Neurological disorder) आहे. अमेरिकत 60 लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत, तर भारतातही या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. 60 वर्षांहून अधिक वय (60 years above people) असणाऱ्या लोकांमध्ये अल्झायमरची समस्या खूप जास्त असल्याचे दिसून आले आहे. अल्झायमर रोगाचा वाढता धोका आणि त्यापासून बचाव याविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिन साजरा केला जातो.

अल्झायमर हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामुळे मेंदूचा काही भाग आकुंचन पावतो. मेंदूतील पेशींचे नुकसान होऊ शकते. अल्झायमर हे डिमेंशियाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक मानले जाते. या दोन्ही परिस्थितींमध्ये व्यक्तीचे विचार, त्याचे वर्तन आणि सामाजिक कौशल्य, यामध्ये सतत घट होत असते.

रोजच्या जीवनातील सामान्य कामं करण्यातही अनेक अडचणी येऊ शकतात. आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये, नुकत्याच घडलेल्या घटना किंवा संभाषण विसरणे, यासारख्या समस्या उद्भवतात. या विकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

वयाच्या 60 व्या वर्षानंतर कोणालाही अल्झायमर होऊ शकतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. परंतु काही लोकांना याचा धोका जास्त असतो. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना किंवा ज्या व्यक्तीच्या कुटुंबात यापूर्वी हा आजार झाला आहे, त्यांना अल्झायमर रोग होण्याचा धोका जास्त असतो.

अल्झायमरवर अद्याप कोणतेही विशिष्ट उपचार सापडलेले नाही. मात्र या आजाराचे निदान झाल्यानंतर काही (सहाय्यक) उपचार केल्यास या रोगाची वाढ रोखण्यास आणि अल्झायमर झालेल्या व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच सर्व लोकांना या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरबद्दल आणि ते टाळण्यासाठी उपाय करण्याचा सल्ला दिला जातो.

डॉक्टराच्या सांगण्यानुसार, अल्झायमरमध्ये विसरण्याची समस्या सर्वात सामान्य आहे. परंतु कालांतराने यामुळे त्या व्यक्तीच्या वागणुकीतही बदल होऊ शकतो. खालीलपैकी काही समस्या सामान्यपणे रुग्णांमध्ये दिसून आल्या आहेत.

– गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येणे – लोकांची नावं विसरणे. – पूर्वी सहजपणे करता येणारी कामे (आता) करणे कठीण वाटणे – – समस्या सोडवण्यात अडचण येणे. – बोलताना किंवा लिहिताना त्रास होणे. – एखादा निर्णय घेण्यात अडचण येणे. – मूड आणि पर्सनॅलिटीमध्ये बदल होणे.

या लक्षणांचा अर्थ असा नव्हे की त्या व्यक्तीला अल्झायमर आहे. या रोगाची कारणे निश्चित करण्यासाठी डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.

का होतो अल्झायमर ?

अल्झायमर रोग का होतो याचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे समजू शकलेले नाही. पण, मेंदूतील प्रथिने (प्रोटीन) सामान्यपणे कार्य करत नाहीत, त्यामुळे मेंदूच्या पेशींच्या (न्यूरॉन्स) कामातही व्यत्यय येतो.

शास्त्रज्ञांना असे वाटते की, अनुवांशिक, जीवनशैली आणि पर्यावरतील घटकांच्या संयोजनामुळे होतो, बहुतांश लोकांना ल्झायमर होतो.

कोणाला असतो अल्झायमरचा धोका ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार,अल्झायमर रोगासाठी वाढते वय हा सर्वात मोठा जोखीम असलेला घटक आहे. मात्र सर्व लोकांना ही समस्या नसते. ज्या व्यक्तींच्या पालकांना (आई-वडील) अल्झायमर झाला होता.

त्या व्यक्तींना हा रोग होण्याचा धोका अधिक असतो. त्याव्यतिरिक्त, जर एखाद्या व्यक्तीला डाऊन सिंड्रोम असेल तर यामुळे अल्झायमरचा धोका देखील वाढू शकतो. तसचे डोक्याला दुखापत वा इजा होणे, वायू प्रदूषण आणि मद्यपाना या घटकांमुळेही अल्झायमरचा धोका वाढतो.

अल्झायमरवरील उपचार

अल्झायमरवर सध्या कोणताही विशिष्ट उपचार नाही. औषधे आणि थेरपी यांच्या मदतीने रोग वाढण्यास प्रतिबंध करता येतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सर्व लोकांनी अल्झायमरला प्रतिबंध करेल अशा पद्धतींचा अवलंब केला पाहिजे.

– नियमित व्यायाम करावा.

– चौरस, पौष्टिक आहार घ्यावा, काजूचे सेवन करावे.

– उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हाय कोलेस्ट्रॉलपासून बचाव करत रहा.

– धूम्रपान वा मद्यपान करू नका.

– प्राणायाम करा.

Non Stop LIVE Update
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....