Figs Benefits: अंजीर खाल्याने शुगर लेव्हल राहते नियंत्रणात, तज्ज्ञांनी सांगितले अनेक फायदे

अंजीर हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक फळ आहे. त्याला इंग्रजीत फिग (Fig) असे म्हणतात.

Figs Benefits: अंजीर खाल्याने शुगर लेव्हल राहते नियंत्रणात, तज्ज्ञांनी सांगितले अनेक फायदे
अंजीर खाल्याने शुगर लेव्हल राहते नियंत्रणात
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 4:40 PM

अंजीर हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक फळ आहे. त्याला इंग्रजीत फिग (Fig) असे म्हणतात. ओला व सुका अंजीर, दोन्हींचे सेवन करणे शरीरासाठी व आरोग्यासाठी (beneficial for health) अतिशय उत्तम व फायदेशीर ठरते. त्याच्या अनेक प्रजाती जगभरात उपलब्ध आहेत. अंजीरामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वं (nutrition) असतात. त्यामध्ये फायबर, प्रोटीन्स, उर्जा, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, फॉलेट, मॅग्नेशिअम अशी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्हाला गोड खायची इच्छा होत असेल तर तुम्ही अंजीराचे सेवन करू शकता. सुक्या अंजीराचे सेवन केल्याने झोपही चांगली येते. आणि वारंवार लागणारी भूक कमी होते. अंजीर खाण्याचे आणखी काय फायदे (benefits) आहेत, ते जाणून घेऊया.

पोटाचे आरोग्य चांगले राहते

आहारतज्ज्ञांच्या मते, अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे फळ उत्तम आहे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांनी आहारामध्ये अंजीराचा समावेश अवश्य करावा. सुके अंजीर रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्यांचे सेवनही करू शकता.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

अंजीरमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असतं, जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास प्रभावी ठरतं. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही ओला अथवा सुका अंजीर यांचे सेवन करू शकता. त्यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे नुकसान होत नाही. अंजीर खाल्ल्याने मधुमेहाचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

हाडांसाठी उत्तम

जर तुम्हाला हाडांमध्ये काही समस्या असेल, वेदना होत असतील किंवा तुमची हाडं कमकुवत झाली असतील, तर अंजीराचे सेवन अवश्य करावे. खरंतर, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे सुका अंजीर खाल्याने हाडं बळकट होतात. तसेच शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही योग्य राखण्यासाठी तुम्ही अंजीर सेवन करू शकता. कारण त्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते.

रक्तदाब कमी करते

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही ओला व सुका अंजीर, अशा दोन्ही प्रकारांचे सेवन करू शकता. अंजीरामध्ये पोटॅशिअम असल्याने त्याच्या नियमित सेवनाने रक्तदाबाचा त्रास टाळता येतो. अंजीर खाल्याने तुम्ही हृदयरोगापासूनही वाचू शकता.

तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर अंजीर खा. या फळामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच अंजीराचे सेवन केल्याने त्वचा, केस निरोगी राहतात. त्यामध्ये असलेले ॲंटी-ऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करतात. अंजीर यकृत निरोगी ठेवते, तसेच शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलला प्रोत्साहन देते.

आजकाल दिवसभराची धावपळ, व्यस्त वेळापत्रक, कामाचा ताण यामुळे आपलं शरीर पूर्णपणे थकून जातं. अशा वेळी शरीराला ऊर्जा देण्यासाठी अंजीरांचे सेवन करावे. कोरडे अथवा सुके अंजीर हे देखील उर्जेचा मुख्य स्रोत आहेत. अंजीर खाल्ल्याने तुम्ही दिवसभर तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह राहू शकता.

Non Stop LIVE Update
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.