तुम्हीही Eye Drop वापरता ? प्रिकॉशन वाचले का ? बाटली उघडल्यावर 28 दिवसांनंतर एक थेंबही वापरू नका, अन्यथा गमवावी लागेल दृष्टी

Eye Drop : आय ड्रॉप्सची बाटली उघडल्यानंतर 28 दिवसांनी ते वापरू नयेत. महिन्याभरानंतर आय ड्रॉप्सचा वापर केल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो.

तुम्हीही  Eye Drop वापरता ? प्रिकॉशन वाचले का ? बाटली उघडल्यावर 28 दिवसांनंतर एक थेंबही वापरू नका, अन्यथा गमवावी लागेल दृष्टी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 7:49 AM

नवी दिल्ली : हवेतील प्रदूषणाची पातळी (air pollution) सातत्याने वाढत आहे. त्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. मोबाईल, टीव्हीचा अतिवापरही डोळ्यांचा शत्रू बनला आहे. याचाच परिणाम म्हणजे आजकाल लहान वयातही बऱ्याच लोकांना चष्मा लावायला लागतो. डोळ्यांचा त्रास, जळजळ होते, ती थांबवण्यासाठी बहुतेक लोक आय ड्रॉप्स (Eye Drop) वापरतात. पण आय ड्रॉप्सची बाटली (eye drop bottle) उघडल्यानंतर किती काळ आय ड्रॉप्स वापरता येतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?

प्रिकॉशन वाचले का ?

खरंतर आय ड्रॉपच्या बाटलीवर खबरदारीसाठी (Eye Drop Precaution) असे लिहीलेले असते की बाटली उघडल्यानंतर 28 दिवसांनी वापरू नये. तथापि, बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. बाटलीचे सील उघडल्यानंतर 28 दिवसांनी औषध वापरल्यास डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. काही वेळा दीर्घकाळ औषध वापरल्यानेही दृष्टी कमी होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

28 दिवसांनी आय ड्रॉप्स वापरू शकतो का ?

नेत्रतज्ज्ञांच्या मते, आय ड्रॉप्सच्या बाटलीचे सील उघडल्यानंतर 28 दिवसांनी आय ड्रॉप्स वापरू नयेत. आपले डोळे अतिशय नाजूक असतात तसेच आणि आय ड्रॉपची बाटलीही संवेदनशील असते. त्यामुळे हे टाळावे. आय ड्रॉप्स उघडल्यानंतर महिन्याभरानंतर त्याचा वापर केल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. वास्तविक, आय ड्रॉप्सचे कंटेट सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यात प्रिझर्व्हेटिवचा वापर केला जातो. आय ड्रॉप्सचे जीवाणू, विषाणू किंवा बुरशीपासून दूषित होण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रिझर्व्हेटिवचा वापर केला जातो.

बहुतांश औषधांमध्ये हे वापरले जाते. प्रिझर्वेटिव्ह्जमुळे औषधांमधील बॅक्टेरिया, विषाणू किंवा बुरशीचा वेग कमी होतो किंवा अजिबात होत नाही.

किती दिवसात औषध खराब होते?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या सूक्ष्मजीवांच्या संसर्गापासून किती दिवस औषध सुरक्षित राहील, हे बाटलीवर लिहिलेले असते. बहुतेक औषधे दीर्घकाळ संसर्गमुक्त राहतात, परंतु काही आय ड्रॉप्सची बाटली उघडल्यानंतर 28 दिवसांनंतर वापरू नयेत असे निर्देश आहेत. सील उघडल्यानंतर ठराविक वेळेनंतर आय ड्रॉप्स दूषित झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या वापरामुळे संसर्गाचा धोका असतो. कारण औषधात वापरल्या जाणार्‍या प्रिझर्व्हेटिव्ह्जचे आयुष्यही सारखेच असते.

28 दिवसांनी आय ड्रॉप्स वापरल्यास काय होते ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर आय ड्रॉप्सचे सील उघडल्यानंतर 28 दिवसांनी त्याचा वापर केला तर अनेक प्रकारचे संक्रमण होण्याचा धोका असतो. सर्वात मोठा धोका डोळ्याच्या बाहुलीला आहे. कधीकधी डोळ्यातील काळी बाहुली पांढरी होते आणि त्यावर कायमस्वरुपी डाग राहतो. याशिवाय डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह संसर्गाचा धोका देखील असतो. जर स्थिती गंभीर असेल तर दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. डॉक्टर सांगतात की अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात रुग्णाच्या बाहुलीला इजा झाली आहे.

इन्फेक्टेड औषधाची लक्षणे

– डोळ्यांत लालसरपणा दिसू लागतो

– डोळ्यांत पाणी जास्त येऊ लागते

– डोळ्यात वेदना होतात

आय ड्रॉप्स वापरण्याची पद्धत

आरोग्य तज्ज्ञांच्या मते आय ड्रॉप्स वापरण्यापूर्वी हात स्वच्छ करावेत. आय ड्रॉप्स वापरल्यानंतरही हात धुवावेत. बाटली उघडल्यानंतर एक महिन्यानंतर, ती सुरक्षित ठिकाणी फेकून द्यावी. आय ड्रॉप्स नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.