Kissing Benefits | चुंबनाने केवळ मूडच नाही, तर आरोग्यही सुधारते! वाचा ‘Kiss’चे आश्चर्यकारक फायदे…

चुंबन घेण्याने केवळ मूड फ्रेश होतो असे नाही तर आरोग्यही सुधारते. वैद्यकीय विज्ञानाच्या मते, चुंबन घेण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत.

Kissing Benefits | चुंबनाने केवळ मूडच नाही, तर आरोग्यही सुधारते! वाचा ‘Kiss’चे आश्चर्यकारक फायदे...
चुंबनाचे फायदे
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 2:17 PM

मुंबई : आपल्या आवडत्या व्यक्तीला किस करणं ही एक अगदी सहजभावना आहे आणि सर्वात सुंदरदेखील! अर्थात यामध्ये नक्कीच कोणी वाद घालणार नाही. तुमचे ज्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे, त्या माणसाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा किस करता तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड साहजिकच वाढलेली असते. जोडीदारास प्रेमाच्या अभिव्यक्तीसह नात्यात मोकळीक वाटण्यात चुंबनाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. परंतु, तुम्हाला माहिती आहे काय की, चुंबन घेण्याने केवळ मूड फ्रेश होतो असे नाही तर आरोग्यही सुधारते. वैद्यकीय विज्ञानाच्या मते, चुंबन घेण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत…(Know the health benefits of kissing)

स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते

एका संशोधनानुसार चुंबन घेण्यामुळे तणाव कमी होतो. मूड रीफ्रेश करण्यात आणि ताजेतवाने होण्यास चुंबन मदत करते. अधिक किस केल्यावर शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे केमिकल सोडले जाते. यामुळे अस्वस्थता आणि निद्रानाशाच्या समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच, हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात देखील फायदेशीर सिद्ध झाले आहे. अनेकदा चुंबन घेणार्‍या लोकांचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

अॅलर्जी दूर होते

चुंबन घेण्यामुळे अॅलर्जीची समस्या देखील कमी होते. चुंबनामुळे मेंदूत डोपामाईन केमिकल रिलीज होते. यामुळे मनाला आनंद होतो आणि सकारात्मक विचारसरणी वाढते. म्हणूनच, ज्यांना अॅलर्जीची समस्या आहे, अशा लोकांना या समस्येतून मुक्ती मिळते.

बर्‍याच काळासाठी दिसाल तरुण

वाढत्या वयाचा परिणाम चुंबनाने देखील कमी होतो. वास्तविक चुंबन शरीरासाठी चांगले कसरत असल्याचे सिद्ध झाले आहे. एका अभ्यासानुसार, चुंबनामुळे एका मिनिटामध्ये सुमारे 26 कॅलरी जळतात. याशिवाय चुंबनाने चेहर्‍याचा रक्त प्रवाह वाढतो. यामुळे त्वचेतील कोलिजेन आणि लवचिकता देखील वाढते, ज्यामुळे त्वचा घट्ट होते आणि आपल्याला बराच काळ तरूण राहण्यास मदत करते.

दात किडत नाहीत

जेव्हा आपण चुंबन घेता तेव्हा तोंडात लाळ तयार होत असते. ही लाळ दात खराब करणारे बॅक्टेरियांपासून संरक्षण करते. एका संशोधनानुसार, चुंबनाने तयार झालेल्या मिनरल्समुळे दातांचा एनामल सुरक्षित राहतो. तथापि, जोडीदाराचे चुंबन घेताना तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण, तोंडाच्या समस्येमुळे संसर्ग देखील होऊ शकतो (Know the health benefits of kissing).

आळस दूर होतो

जेव्हा आपण एखाद्याचे चुंबन घेतो, तेव्हा मेंदूत डोपामाईन नावाचे एक केमिकल सोडले जाते. त्यामुळे मूड फ्रेश होते. यामुळे, झोपेची समस्या, आळस आणि थकल्यासारखे वाटणे यापासून मुक्ती मिळते. चुंबन केल्याने आत्म समाधान देखील मिळते. चुंबनाने, शरीर क्रियाशील राहते आणि आपण नेहमी उत्साही राहता.

वेदनांसाठी रामबाण

आपल्या शरीरात बर्‍याच वेळा वेदना होतात, डोकेदुखी किंवा इतर कोणत्याही समस्येची तक्रार असते, तेव्हाही चुंबन घेणे फायदेशीर ठरते. चुंबनाने शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो. जर पीरियड्समुळे स्नायू दुखरे झाले असतील, तर चुंबन घेतल्याने बरे वाटते.

रक्तदाब नियंत्रित राहतो

एका संशोधनानुसार चुंबन घेतल्याने रक्तदाबही नियंत्रित राहतो, हे सिद्ध झाले आहे. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवते. तसेच ताण निवळतो. यामुळे मन मोकळे राहण्यास आणि रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. तसेच रागही कमी होतो.

(Know the health benefits of kissing)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.