AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food Side Effects : हे पदार्थ खाल तर वाढेल डोक्याचा ताप, स्ट्रेस असताना काही पदार्थ खाणे टाळा

आपण काय खातो यावर आपली तब्येत आणि आरोग्य चांगले की खराब हे ठरते. काही पदार्थ असे असतात. त्यामुळे शरीरातील तणावाची पातळी वाढते.

Food Side Effects : हे पदार्थ खाल तर वाढेल डोक्याचा ताप, स्ट्रेस असताना काही पदार्थ खाणे टाळा
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 02, 2023 | 3:44 PM
Share

नवी दिल्ली : लोकांच्या रोजच्या आहारात (diet) विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश केला जातो. लोक या पदार्थांमधून प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे घेतात. आपण पौष्टिक आहारच खावा, असा सल्लाही डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही जे अन्न सकाळ, दुपार, संध्याकाळी जेवत आहात. या सगळ्याचा फायदा (benefits of food) होतो का? डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपण जे काही खातो, त्या प्रत्येक पदार्थाचा फायदाच होईल असे नाही. अन्नातील अनेक घटकांचा शरीरावर नकारात्मक परिणाम (negative impact of food) होतो. त्याचबरोबर असे काही पदार्थ आहेत जे तणावाची अर्थात स्ट्रेसची (stress) पातळी वाढवतात. अशावेळी पदार्थांचे काळजीपूर्वक सेवन केले पाहिजे. असे खाद्यपदार्थ कोणते त्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गोड पदार्थांमुळे वाढू शकतो स्ट्रेस

साखर किंवा इतर गोड पदार्थ, त्यामध्ये ग्लुकोज, सुक्रोज फ्रक्टोज आढळतात. हे सर्व शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्याचे काम करतात. रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात कमी होणे किंवा काहीवेळा त्यात जास्त वाढ याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. त्यामुळे तणाव वाढतो. त्याशिवाय केक, पेस्ट्री यांसारखे पदार्थ रक्तातील साखर वाढवतात आणि त्यामुळे एनर्जी लेव्हलही वर-खाली होते. जेव्हा रक्तातील साखर अचानक कमी होते किंवा वाढते, तेव्हा तुमचा मूड खराब होतो आणि तणावाची पातळी वाढू शकते.

अधिक कॅफेनचे सेवन हानिकारक

आजकाल लोकांना हार्ड ड्रिंक्स प्यायला आवडते. अनेक एनर्जी ड्रिंक्स आहेत, ज्यामध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते. कॅफिन शरीराला सक्रिय बनवण्याचे काम करते व उर्जा वाढते. मात्र कॅफेन हे रक्तदाब वाढवण्याचे काम करते. याशिवाय लोक इतर मार्गांनी कॅफिनचे सेवन करू शकतात. पण त्याचा तोटा असा आहे की ते चिंता व स्ट्रेस वाढवण्याचे काम करते. याचा प्रभाव मज्जासंस्थेवर पडतो. तसेच आपला मेंदू आणि हृदयावरही त्याचा परिणाम दिसून येतो.

रिफाइंड कार्ब्सचा वापर

ब्रेडसारख्या पदार्थांद्वारे लोक रिफाइंड कार्ब्सचे खूप जास्त सेवन करतात. यामुळे शरीरात सूज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तणाव निर्माण होतो व तो वाढूही शकतो.

कृत्रिम स्वीटनर्स 

शुगर पेशंटकडे पाहून सध्या आर्टिफिशिअल स्वीटनर्सची मागणी वाढली आहे. साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम स्वीटनर वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या साखरेचा शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होत नाही. त्याचबरोबर या प्रकारच्या साखरेचे जास्त सेवन केल्याने शरीरात सूज येऊ शकते, जळजळही वाढू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळेच चिंता आणि तणाव संबंधित समस्या उद्भवू शकतात.

उच्च चरबीयुक्त आहार

आजच्या जीवनशैलीत लोक स्निग्ध पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. त्याचा परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. यामुळे सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत तणाव निर्माण होऊ शकतो व प्रसंगी तो आणखीनच वाढू शकतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.