AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबब.. 200 किलो वजन पेलवेना… 10 व्या वर्षी त्याने असे घटवले तब्बल 114 KG वजन

weight loss : इंडोनेशियातील एका 9 वर्षांच्या मुलाचे काही वर्षांपूर्वी वजन सुमारे 200 किलो होते. त्याने अथक मेहनत करून वजन कमी केले असून आता त्याचे वजन सुमारे 86 किलो आहे. हे कसं झालं जाणून घेऊया.

अबब.. 200 किलो वजन पेलवेना... 10 व्या वर्षी त्याने असे घटवले तब्बल 114 KG वजन
Image Credit source: social media
| Updated on: Mar 30, 2023 | 12:29 PM
Share

जकार्ता : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांचे वजन (weight) सरासरीपेक्षा जास्त असते. काही वर्षांपूर्वी तुम्ही सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा फोटो पाहिला असेल, ज्यामध्ये एका लहान मुलाचे वजन खूप जास्त होते. त्या मुलाचे नाव आर्य परमाना आहे, जो जगातील सर्वात जाड मुलगा म्हणून प्रसिद्ध होता. पण आता आर्य पूर्णपणे बदलला आहे, कारण त्याने अथक मेहनत करून त्याचे 114 किलो (114 kg weight loss) वजन कमी केले आहे.

वजन कमी करण्यापूर्वी वयाच्या 10 व्या वर्षी आर्यचे वजन सुमारे 200 किलो झाले होते. वजन कमी करण्यासाठी त्याला इंडोनेशियाच्या प्रसिद्ध आणि व्यावसायिक बॉडीबिल्डरने मदत केली. आर्यचे वजन नेमके कसे कमी झाले? याबद्दल जाणून घ्या.

या कारणांमुळे वाढले आर्यचे वजन

इंडोनेशियात राहणाऱ्या आर्यला व्हिडीओ गेम्स खेळायला खूप आवडायचे. तो दिवसभर प्रोसेस्ड फूड, झटपट नूडल्ससारखे जंक फूड, तळलेले चिकन आणि कोल्ड्रिंक्स यांसारखे खाद्यापदार्थ सेवन करत होता. म्हणजेच एवढ्या लहान वयातही तो सुमारे 7000 कॅलरीज वापरत होता, जे त्याच्या शरीराच्या आवश्यकतेपेक्षा सहा ते सात पट जास्त होते. मात्र यामुळे त्याचे वजन भरमसाठी वाढले, ते इतके की आर्यला न चालता येत होते ना बसता. घरात अंघोळही करता येत नसे, म्हणून ते घराबाहेर मोठ्या हौदात स्नान करत असे. त्याच्या मापाचे धड कपडेही मिळत नव्हते.

वेट ट्रेनिंग घेऊन केले वजन कमी

एप्रिल 2017 मध्ये आर्यवर बॅरिॲट्रिक सर्जरी झाली, ज्यानंतर तो बॅरिॲट्रिक सर्जरी झालेला सर्वात लहान मुलगा ठरला. जकार्ता येथील ओम्नी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर, त्याने बॉडीबिल्डिंग चॅम्पियन अडे राय यांची भेट घेतली, ज्यांच्याकडे एका जिमचे मालक आहेत. आदे यांना जेव्हा आर्यबद्दल कळले तेव्हा त्यांनी आर्यसाठी मदतीचा हात पुढे केला आणि मग ते आर्यच्या घरच्यांशीही बोलले. आदे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आर्यने त्याच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आणि भाज्या, संपूर्ण धान्य यांसारख्या कमी कार्ब पदार्थ खाण्यास सुरुवात केली. यासोबतच त्याने आदेसोबत दररोज वेट ट्रेनिंगही सुरू केले, ज्यामुळे कॅलरी बर्न आणि स्नायू टोन होण्यास मदत झाली.

व्यायाम करण्यात आली मजा

आर्यला जिममध्ये व्यायाम करायला मजा येऊ लागली. आर्य खूप चालत असे, ज्यामुळे त्याला अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. आर्यने तीन वर्षांत अर्ध्याहून अधिक वजन कमी केले आहे आणि आता तो 13-14 वर्षांचा झाला आहे. आदे आणि आर्यचे नाते खूप घट्ट झाले आहे आणि दोघेही काका-पुतण्यासारखे राहतात. आर्य आता शाळेत जाऊ लागला आहे. तो स्वतःची कामे आता स्वत:च करू शकतो. तसेच इतर मुलांप्रमाणे फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळू शकतो .

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....