AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

contraceptive pills : गर्भ निरोधक गोळ्या घेतल्याने काय होतात फायदे ? आणि त्याचे तोटे काय आहेत ?

गर्भ निरोधक गोळ्या घेण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्याचे बरेच तोटेही असू शकतात. ते काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

contraceptive pills : गर्भ निरोधक गोळ्या घेतल्याने काय होतात फायदे ? आणि त्याचे तोटे काय आहेत ?
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 22, 2023 | 2:40 PM
Share

अमेरिकेत आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही महिला गर्भ निरोधक गोळ्या किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स (Contraseptive pills) घेऊ शकतात. कोणत्याही वयाची महिला या गर्भ निरोधक गोळ्या, ओपील घेऊ शकते, अशी घोषणा नुकतीच अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने केली. 2024 च्या सुरुवातीला त्यांची औषधे फार्मसीच्या दुकानात उपलब्ध होतील असे ओपीलने स्पष्ट केले. अमेरिकेसह जगात 100 देश आहेत, जिथे गर्भनिरोधक औषधे औषधांच्या दुकानात मिळू शकतात. या देशांच्या यादीत लॅटिन अमेरिका, चीन, ब्रिटन व्यतिरिक्त भारताचाही समावेश आहे.

अमेरिकेतील महिला तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, या गर्भनिरोधक औषधांबाबत बहुतांश महिलांना, किशोरवयीन मुलींना पूर्वी लाज वाटायची. तसेच प्रजननाशी संबंधित आरोग्य सेवा मिळवण्यासाठी त्यांना पूर्वी समस्यांचा सामना करावा लागत असे, मात्र आता त्याबाबतीतही मदत मिळेल. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, वैद्यकशास्त्राच्या इतिहासात हजारो औषधे विकसित करण्यात आली होती, परंतु 1950 मध्ये गर्भनिरोधक औषधांच्या विकासानंतर मोठा बदल झाला. त्यात लिहिलेल्या माहितीनुसार, गर्भनिरोधक गोळ्यांनी महिलांना स्वातंत्र्य तर दिलेच पण प्रजननाची स्वायत्तताही मिळाली.

भारतात कुटुंब नियोजन

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने 1952 मध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. याअंतर्गत सरकारकडून आरोग्य केंद्रांमध्ये गर्भनिरोधक औषधे आणि कंडोमही मोफत दिले जातात, तर आशा कार्यकर्त्याही ती उत्पदाने लोकांना उपलब्ध करून देण्याचे काम करतात.

एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही संप्रेरक असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांना COC म्हणतात, तर इतर ज्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते त्यांना POPs म्हणतात. महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही हार्मोन्स असतात. आणि गर्भनिरोध गोळ्यांमध्ये याच हार्मोन्सचा वापर केला जातो, ज्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात.

गर्भ निरोधक गोळ्यांचा परिणाम

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गर्भ निरोधक गोळ्या घेण्याचा काही मोठा दुष्परिणाम होत नाही पण COC आणि POP घेतल्याने महिलांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. ज्या औषधांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन असते ते ज्या महिलांना ब्लड क्लॉटचा त्रास, हृदयविकार , उच्च रक्तदाब असतो त्यांना मदत करते. तर ज्या औषधांमध्ये प्रोजेस्ट्रॉन असते, त्याचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये मळमळ, डोकेदुखी, अनियमित मासिक पाळी आणि चक्कर येणे असा त्रास जाणवू शकतो.

गर्भनिरोधक औषधे घेतल्याने महिलांवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. त्यापैकी काही म्हणजे –

– शरीरात पाणी जमा होणे

– शरीर जड वाटणे

– पिंपल्स, मुरुमे येणे

– स्तन जड झाल्यासारखे वाटणे

– मूड स्विंग्स

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार गर्भनिरोधक गोळ्या बऱ्याच काळापर्यंत घेता येतात व त्याचे जास्त दुष्परिणाम होत नाहीत.

गर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांमुळे कुटुंब नियोजन करता येते.

– मासिक पाळीचे नियमित होण्यास मदत

– मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्त्राव हत असेल तर ते कमी करण्यात मदत करते

– गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो

ही औषधे घेतल्याने कॅन्सरचा धोका वाढतो, असा गैरसमज आहे, पण खरंतर तस नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रोटेक्शनशिनाय शरीरसंबंध ठेवल्यानंतर १२० तासांच्या आत (५ दिवस) आयपिल घेण्याचा सल्ला गिला, ज्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. आयपीलमध्ये प्रोजेस्ट्रॉन वापरले जाते, व त्याचे प्रमाणही जास्त असते.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.