AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indigestion in Winter: हिवाळ्यात का वाढतात पचनासंबंधी समस्या ? जाणून घ्या कारणे

हिवाळ्यात, बऱ्याच लोकांना पोटाशी संबंधित आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत खाण्या-पिण्याबरोबरच इतर गोष्टींचीही विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

Indigestion in Winter: हिवाळ्यात का वाढतात पचनासंबंधी समस्या ? जाणून घ्या कारणे
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 14, 2023 | 9:43 AM
Share

नवी दिल्ली – हिवाळा सुरू आहे, कडाक्याच्या थंडीमुळे लोकांना अनेक आरोग्य समस्यांचा (health problems) सामना करावा लागतो. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या (indigestion) समस्येचा सामना करावा लागतो. काही लोकांना सकाळी पोट रिकामं करणं सोपं वाटतं, तर काहींसाठी ते अवघड असतं. त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो, ज्यामुळे लोकांना पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात पचनाच्या समस्या का ( indigestion in Winter) वाढतात हे जाणून घेऊया.

हिवाळ्यात अपचन वाढण्याचे कारण

हिवाळ्यात बर्‍याच लोकांचे मेटाबॉलिजम (चयापचय) मंदावते, ज्यामुळे नियमितपणे मलत्याग करणे हे कठीण होते. त्यामुळे पोटाचा त्रास कायम राहतो. म्हणून, त्याचे मूळ कारण समजून घेणे महत्वाचे आहे, ज्यामुळे आपण समस्येपासून मुक्त होऊ शकू.

1) अधिक जंक फूड खाणे

थंडीच्या दिवसांत लोकांना चविष्ट पदार्थांचा स्वाद घेणे खूप आवडते.पण जंक फूडमुळे केवळ तुमचे पचन मंदावत नाही तर ब्लोटिंग सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, ज्यामुळे पाचक आरोग्याला हानी पोहोचू शकते. जंक फूड हे चविष्ट तर असते पण त्यात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो, यामुळे इर्रिटेबल बाऊल सिंड्रोमदेखील होऊ शकतो. जंक फूड व्यतिरिक्त, प्रक्रिया केलेले अन्न खाणे देखील टाळावे. त्याऐवजी तुम्ही शिजवलेल्या भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, ताजी फळे आणि बिया खाऊ शकता. तसेच मसालेदार अन्नापासून दूर रहावे कारण त्यामुळे छातीत जळजळ आणि पोटदुखी होऊ शकते. तसेच प्रमाणात खावे, अति खाल्यानेही पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

2) पुरेसे पाणी न पिणे

तापमानात घट झाल्यामुळे, आपण पाण्याचे सेवन देखील कमी करतो. शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, आतड्यांना अन्न पचण्यास त्रास होतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे, हिवाळ्यात पचनाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी पुरेसे पाणि किंवा द्रव पदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न करा.

3) कार्बोनेटेड पेय

थंडी सुरू होताच, या काळात सोडा आणि कोल्ड्रिंक्ससारख्या पदार्थांच्या जागी कॉफी किंवा फळांचा रस सेवन करावा. कोल्ड्रिंक्ससारख्या पेयांमध्ये भरपूर साखर व असे घटक असतात, ज्यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते आणि वेदना होऊ शकतात. याशिवाय अशा पेयांमुळे आपल्या दातांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

4) तणाव

हिवाळ्यातील थंड हवा काही वेळा आपल्या शरीरासाठी आणि विशेषतः पचनसंस्थेसाठी तणावपूर्ण ठरू शकते. यामुळे पोटात कळ येणे, पोट फुगणे आणि भूक न लागणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करणे, योगासने, मेडिटेशन, चालायला जाणे, अशा क्रिया कराव्यात. यामुळे तणावमुक्त राहता येते.

5) झोपेची कमतरता

चांगली झोप ही एक औषध म्हणून काम करते, ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. झोपेच्या कमतरतेमुळे तणावाची पातळी वाढू शकते जे आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले नाही. चांगली झोप म्हणजे उत्तम स्ट्रेस मॅनेजमेंट. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कमीतकमी 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

वरील सर्व कारणांव्यतिरिक्त, अपचन आणि पोटदुखीशी संबंधित वेदना कमी करण्यासाठी स्वतःला उबदार ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यामुळे हिवाळ्यात पुरेसे उबदार कपडे घालावे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.