Health | हातामध्ये तीव्र वेदना होतात? मग जाणून घ्या याची कारणे आणि उपाय!

| Updated on: May 20, 2022 | 6:00 AM

अचानक हातामध्ये तीव्र वेदना होणे. विशेष म्हणजे वेदना केवळ हातांमध्येच नाही तर कंबर आणि गुडघ्यातही होऊ शकते. सांधेदुखीचा त्रास एका ठिकाणी होत नाही. सुरुवातीला जिथे वेदना होतात तिथे काही काळानंतर दुसऱ्या ठिकाणी वेदना होऊ शकतात.

Health | हातामध्ये तीव्र वेदना होतात? मग जाणून घ्या याची कारणे आणि उपाय!
Image Credit source: drbagga.com.au
Follow us on

मुंबई : कंबर, हात, पाय, गुडघे किंवा सांधे दुखण्याच्या लोकांची संख्याही झपाट्याने वाढताना दिसते आहे. ही समस्या (Problem) विशिष्ट वयानंतर होणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्याच्या खराब जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयामध्ये लोकांना सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येते आहे. यामुळे हात न उचलता येणे, उभे न राहता येणे, वारंवार पायाला आणि हाताला मुंग्या येणे ही सर्वच संधिवाताची (Rheumatoid arthritis) लक्षणे आहेत. आपल्यापैकी अनेकजण या लक्षणांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. यामुळे आजार आणखीन घातक बनतो. संधिवात असताना बहुतेक लोकांना त्यांच्या हातामध्ये वेदना होतात. अचानक हात उचलता देखील येत नाही. संधिवात असताना नेमकी कोणती काळजी (Care) घ्यायला हवी आणि संधिवाताची प्रमुख लक्षणे कोणती याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

-अचानक हातामध्ये तीव्र वेदना होणे. विशेष म्हणजे वेदना केवळ हातांमध्येच नाही तर कंबर आणि गुडघ्यातही होऊ शकते. सांधेदुखीचा त्रास एका ठिकाणी होत नाही. सुरुवातीला जिथे वेदना होतात तिथे काही काळानंतर दुसऱ्या ठिकाणी वेदना होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

-सांधेदुखीचा त्रास असल्यास सांधे लाल होऊन सुजतात. त्या भागात दाहक वेदना होतात. बोटे नेहमीपेक्षा जास्त फुगतात, कोणत्याही प्रकारे हलवता येत नाहीत. काहीही पकडणे देखील कठीण आहे. बोट सरळ केल्यावर एक प्रकारचा आवाज येतो आणि तसेच सांधे सुजतात. पायाची सामान्य हालचाल करता येत नाही.

-ही समस्या केवळ प्रौढांमध्येच नाही तर मुलांमध्ये देखील होऊ शकते. सांधेदुखीचा त्रास सकाळी सर्वात जास्त होतो. विशेष: संधिवात असलेल्यांना हिवाळ्याच्या हंगामात जास्त त्रास होतो. हिवाळ्याच्या हंगामात त्यांच्या साध्यावर जास्त सूज येते आणि त्रासही होतो.

-संधिवात असल्यास प्रक्रिया केलेले अन्न खाणे पूर्णपणे टाळायला हवे. प्रक्रिया केलेले अन्न शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे दाह वाढू शकतो. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जर आपल्याला संधिवातेचा त्रास होत असेल तर आपण प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळलेच पाहिजे.