Health : फक्त 1 ग्लास दूध आणि 2 खजूर, महिलांसाठी अमृतासारखा कारण या आजारांपासून सुटका

खजुर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. खजूरमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन असे अनेक गुणधर्म असतात जे शरीरासाठी गुणकारी ठरतात. 

Health : फक्त 1 ग्लास दूध आणि 2 खजूर, महिलांसाठी अमृतासारखा कारण या आजारांपासून सुटका
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 1:44 PM

मुंबई : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो. मग हार्मोन्सशी संबंधित समस्या, अशक्तपणा, थकवा अशा अनेक समस्या महिलांना सतावत असतात. तर या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर तुम्हालाही हार्मोन्सशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असेल तर खजुर आणि दूधाचे सेवन करा. महिलांनी एक ग्लास दूधासोबत खजूर खाल्लं तर काय फायदे होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

मासिक पाळी नियमित होण्यात मदत – बहुतेक महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही. तसंच काही महिलांना पाळीशी संबंधित अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. तर अशावेळी महिलांनी दूध आणि खजूर खाणं फायदेशीर ठरतं. कारण दूधासोबत खजूर खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि रक्त देखील वाढते. सोबतच रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो त्यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. तसेच दुधासोबत खजूर खाल्ल्याने तुम्हाला जास्त भूक लागत नाही आणि तुमचं वजन देखील नियंत्रणात राहते.

हार्मोन्सशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत – दूधासोबत खजूर खाल्ल्यामुळे हार्मोन्सशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे महिलांनी दूध आणि खजूर खाण खूप फायदेशीर ठरते. खजूर महिलांच्या लैंगिक आरोग्यास प्रोत्साहन देते. तसंच इस्ट्रोजेन पातळी देखील संतुलित करण्यास मदत करते. महत्त्वाचं म्हणजे खजूर आणि दूध PCOD च्या समस्येपासून महिलांचा बचाव करते. तर मासिक पाळीदरम्यान स्त्रियांमध्ये राग, चिडचिड होत असते तर खजूर खाल्ल्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

अॅनिमियापासून सुटका – दररोज सकाळी दूधासोबत खजूर खाल्ल्यामुळे अॅनिमियाचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्यामुळे खजूर आणि दूधाचा समावेश आहारात करणं गरजेचं आहे. खजूर आपल्या शरीराला लोह, व्हिटॅमिन सी, फायबर देते. तसंच गरम दुधात खजुर टाकून ते खाल्लं तर हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत होते.

Non Stop LIVE Update
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.