AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monkeypox : मंकीपॉक्समुळे ‘मेंदूज्वरा’सह मेंदूवर येऊ शकते सूज; मंकीपॉक्सबाबत नवीन अभ्यास आला समोर!

मंकीपॉक्सने जगभरात थैमान घातलेल असताना या आजाराचे शरीरावर काय परिणाम होत आहेत, याबाबत नवी माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, मंकीपॉक्समुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्याही उद्भवू शकतात.

Monkeypox : मंकीपॉक्समुळे ‘मेंदूज्वरा’सह मेंदूवर येऊ शकते सूज; मंकीपॉक्सबाबत नवीन अभ्यास आला समोर!
मंकीपॉक्समुळे ‘मेंदूज्वरा’सह मेंदूवर येऊ शकते सूज
| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 7:13 PM
Share

भारतात मंकीपॉक्सची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, मंकीपॉक्सबाबत नवा अभ्यास (A new study on monkeypox) अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, मंकीपॉक्समुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्या (Mentally Problems)ही उद्भवू शकतात. मंकीपॉक्सने ग्रस्त रुग्णाच्या त्वचेवर पुरळ उठते. तथापि, मंकीपॉक्सपासून संरक्षण करण्यासाठी चेचक लस प्रभावी आहे. परंतु चेचक विरुद्ध लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या (Neurological problems) आढळल्या आहेत.

लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक फाउंडेशनचे डॉ. जेम्स ब्रंटन बॅडेनॉक यांनी या अभ्यासाविषयी सांगितले की, हा अभ्यास मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल किंवा मानसिक समस्या शोधण्यासाठी करण्यात आला होता. ज्याचा अहवाल ‘क्लिनिकल मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

ही आहेत लक्षणे

अहवालानुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना मेंदूची जळजळ, एन्सेफलायटीससह न्यूरोलॉजिकल समस्या विकसित होतात. गंभीर आणि दुर्मिळ मेंदूच्या समस्यांबरोबरच, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यासारखी लक्षणे मंकीपॉक्सने संक्रमित लोकांमध्ये आढळतात. तथापि, अभ्यास पाहता लक्षणे किती गंभीर आहेत हे स्पष्ट होत नाही.

काय आढळले अभ्यासात ?

गंभीर आणि दुर्मिळ मेंदूच्या समस्यांव्यतिरिक्त, रुग्णांना डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यासह अधिक सामान्य न्यूरोलॉजिकल लक्षणे आढळली आहेत. मंकीपॉक्स असलेल्या लोकांच्या व्यापक गटामध्ये ही लक्षणे किती गंभीर होती हे अभ्यासावरून स्पष्ट झाले नाही.

मंकीपॉक्स असलेल्या किती लोकांना चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक समस्या होत्या, हे देखील स्पष्ट झाले नाही. मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांमध्ये या न्यूरोलॉजिकल समस्या कशामुळे झाल्या यावर अभ्यास सुरू असल्याचे संशोधकांनी सांगितले.

तज्ज्ञ म्हणाले, जर या विषाणूमुळे या समस्या उद्भवत असतील, तर त्याच्या अंतर्गत असलेल्या जैविक प्रक्रिया अस्पष्ट आहेत आणि व्हायरस थेट मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतात.

आमचे संशोधन सध्याच्या मंकीपॉक्स महामारीपूर्वीच्या पुराव्यांवर केंद्रित आहे. बहुतेक आकडेवारी पश्चिम आफ्रिकेतील होती आणि रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांना संसर्ग झाला आहे. तर साथीच्या रोगाचा प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपवर परिणाम झाला आहे.

एक चतुर्थांशपेक्षा जास्त डोकेदुखी आढळली

‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये केलेल्या अभ्यासात सध्याच्या उद्रेकामुळे प्रभावित 16 देशांतील 500 हून अधिक लोकांचा समावेश आहे. ‘एन्सेफलायटीस’ची कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नसली तरी, मंकीपॉक्स असलेल्या दहापैकी एक चतुर्थांश लोकांमध्ये डोकेदुखीची लक्षणे होती.

तथापि, स्पेनमध्ये नुकतेच मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांमध्ये ‘एंसेफलायटीस’ची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव हा जागतिक चिंतेचा विषय आहे आणि सर्व लोकांसाठी लसीकरणाच्या उपलब्धतेसह सार्वजनिक आरोग्य उपायांची आवश्यकता आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.