AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला या सवयी आहेत…त्याचा होऊ शकतो मुलांवर परिणाम…तर सोडा या सवयी

अरे काय करतोय बस्स आता मोबाईल बाजूला ठेव आणि खेळायला जा, काही तरी वाच...असा आवाज आजकाल प्रत्येक घरात ऐकू येत आहे. पण आता एक अजून आवाज येतोय ऐ आई माझ्याशी बोल ना, यांचा अर्थ काय, अगं आई ऐकते का...तो मोबाईल ठेव ना बाजूला आणि बोल माझ्याशी...हो स्मार्टफोन आल्यामुळे महिलांनाही त्यांचं वेड लागलं आहे. हा सवय तुमच्या मुलावर परिणाम होऊ शकतो.

तुम्हाला या सवयी आहेत...त्याचा होऊ शकतो मुलांवर परिणाम...तर सोडा या सवयी
Good Habits
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 6:12 PM
Share

मुलांचं संगोपन करणं ही खूप मोठी जबाबदारी असते. आई-वडिलांची दोघांची ती जबाबदारी असते. आपण काय बोलतो, काय वागतो यांचं अनुकरण ही मुलं आपसूक करत असतात. त्यामुळे मुळात आपल्याला पहिले अशा कुठल्या चुकीच्या सवयी असतील तर त्या बदलणं गरजेचं आहे. मुलांचं विश्व आईच्या अवती-भवती असतं. त्यामुळे खास करुन आईला आपल्या सवयीबद्दल जागृत राहणं खूप गरजेचं आहे. या सवयी मुलांसाठी ठरतात घातक

मोबाईलची सवय स्मार्टफोनच्या जगात आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. कोरोनामुळे दीड वर्षं शाळा बंद होत्या त्यामुळे आपसुक मुलांच्या हातात स्मार्टफोन आलेत. ऑनलाईन शाळेमुळे पालकांना मुलांना मोबाईल द्यावे लागले. पण त्याच बरोबर अनेक आईला देखील सतत मोबाईलवर राहण्याची सवयही झाली आहे. मुलं आईला हाक मारत राहतात, मात्र त्या मोबाईलमध्ये शॉपिंग, चॅटिंग, गेम किंवा फोनवर बोलण्यात इतके व्यस्त असतात. की ते मुलांकडे लक्ष द्यायला विसरुन जातात. याचा परिणाम मुलांच्या संगोपणावर होतो. या मोबाईलच्या सवयीमुळे तुम्ही मुलांना कमी वेळ देता. त्यामुळे मुलांच्या मनावर याचा परिणाम होतो. ते सुद्धा मग दिवसभर मोबाईलसोबत वेळ घालवत असतात. आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर होतो.

तुमची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याची पद्धत आज महिला घर आणि नोकरी अशा दोन्ही तारेवरची कसरत करत आहे. त्यात मुलांना सांभाळणं, त्यांना चांगली सवय लावणं हे अजून कठिण होऊन बसलं आहे. ऑफिस आणि घरच्या कामात तुम्ही इतके बिझी असता, की अवेळी जेवण, रात्रीचं जागरण सकाळी उशिरा उठणं आणि अगदी व्यायाम न करणं. अनेक वेळा तुम्ही जेवण करु शकत नाही. यामुळे तुमच्या या लाईफस्टाईलचा परिणाम तुमच्या मुलांवर होतो. मग अशावेळी बाहेरचं जेवण, जंकफूड खाण्याची सवय मुलांना लागते.

जेवताना टीव्ही पाहणे दिवसभराच्या कामात तुम्हाला दोन निवांत क्षण मिळतात ते म्हणजे जेवताना. मग अशावेळी तुम्ही टीव्हीकडे वळता. जेवताना टीव्ही पाहणे ही तुमची सवय मुलांच्या शारीरिक विकासात अडथळा आणते. तुम्हाला पाहून मुलंही टीव्हीसमोर जेवायला बसतात, आणि यामुळे त्यांचं जेवणाकडे लक्ष नसतं. याचा परिणाम शरीरासाठी लागणारे पोषकतत्वे त्यांना मिळत नाही.  प्रत्येक आई ही चांगलीच असते. ती तिच्या मुलांवर अतोनात प्रेमही करते. त्याला घडविण्यासाठी ती प्रयत्न पण करते. मात्र आपल्याकडून न कळत होणाऱ्या चुकीच्या सवयींचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे त्या वेळीच ओळखा आणि त्यांना आळा घाला. आणि उद्याची चांगली पिढी घडविण्यात हातभार लावा.

Beed : 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा

Shiv Sena : ‘कानड्यांना अक्कल यावी, याकरता असा निषेध करत आहोत’

Beed : 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.