AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navaratri | नवरात्रीच्या उपवासामध्ये हे पदार्थ खाणं टाळा, नाहीतर उपवासाचा काहीस नाही फायदा!

उपवासाच्या दिवसांमध्ये कोणते पदार्थ खायचे आणि कोणते नाही खायचे याबाबत भरपूर लोकांच्या मनात संभ्रम असतो. तर आता आपण काही अशा पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे नवरात्रीच्या दिवसांमध्ये खाणं टाळावं.

Navaratri | नवरात्रीच्या उपवासामध्ये हे पदार्थ खाणं टाळा, नाहीतर उपवासाचा काहीस नाही फायदा!
navratra fast 2023
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 17, 2023 | 10:22 PM
Share

मुंबई : सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. तसेच या नऊ दिवसांमध्ये लोक उपवास करतात, दुर्गा देवीची पूजा करतात. तर काही लोकांचे उपवास खूप कडक असतात, म्हणजेच काही लोक निरंकार उपवास करतात तर काही लोक फक्त फळ खातात. तर काही लोक खिचडी, भगर खातात. पण काही लोकांच्या मनात नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की कोणते पदार्थ खाऊ नये याबाबत संभ्रम असतो. कारण नवरात्रीचे उपवास हे फार कडक उपवास असतात.

मसाले – नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर उपवास करत असाल तर काही मसाले आहेत जे तुम्ही खाणे टाळले पाहिजे किंवा तुम्ही खिचडी, भगर करत असाल तर त्यामध्ये या मसाल्यांचा वापर चुकूनही करू नका. यामध्ये हळद आणि गरम मसाले यांचा समावेश आहे. तर तुमचा उपवास असेल तर चुकूनही हळद आणि गरम मसाल्याचा समावेश तुमच्या खिचडीमध्ये किंवा भगर मध्ये करू नका. तसेच नवरात्रीच्या काळात जिरेपूड वापरणे देखील टाळा.

धान्य –  नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करत असाल तर धान्यापासून दूर राहा. मग या धान्यामध्ये गहू, तांदूळ, बेसन, कॉर्नफ्लॉवर, रवा या गोष्टींचा समावेश आहे. तर उपवासाच्या दिवसांमध्ये या धान्यांचा समावेश तुमच्या आहारात करू नका.  तसेच नाचणी, बाजरीचे किंवा ज्वारीच्या पिठाचा देखील समावेश तुमच्या आहारात करू नका.

भाज्या- नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास करत असाल तर भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करणे टाळावे. या उपवासाच्या दिवसांमध्ये काही भाज्या खाल्ल्या तर चालतात पण काही भाज्या चुकूनही खाऊ नका. उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही लसुन, कांदा चुकूनही खाऊ नका. तसेच कांदा, टोमॅटो, बटाटा, पालक या भाज्यांचं सेवन तुम्ही उपवासाच्या दिवसांमध्ये करू शकता. महत्त्वाचं सांगायचं झालं तर टोमॅटोला लोक फळ मानतात त्यामुळे त्याचा फळ म्हणून तुम्ही उपवासात समावेश करू शकता.

मांसाहारी पदार्थ आणि दारू – नवरात्रीच्या उपवासांमध्ये मांसाहारी पदार्थ, अंडी या पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका, असे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे. तसेच दारूचे सेवन देखील करू नका. कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये अशा गोष्टींचे सेवन करणे म्हणजे पाप मानलं जातं. त्यामुळे अशा गोष्टीचे सेवन चुकून पण करू नका.

मीठ – नवरात्रीच्या उपवासाच्या दिवसांमध्ये पांढऱ्या मिठाचा वापर करू नका. पांढर्‍या मिठाऐवजी तुम्ही काळ्या मिठाचा वापर करू शकता. काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, जे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही उपवास करत असाल तर काळ्या मिठाचे सेवन करा.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?