AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 हजारांवर, सक्रिय रुग्णसंख्येतही घट सुरु

गेल्या 24 तासात भारतात 12 हजार 428 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 356 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 15 हजार 951 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 हजारांवर, सक्रिय रुग्णसंख्येतही घट सुरु
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 26, 2021 | 10:08 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 12 हजार 428 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 356 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता पावणेदोन लाखांच्या आत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 12 हजार 428 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 356 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 15 हजार 951 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 42 लाख 2 हजार 202 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 83 हजार 318 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 55 हजार 68 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 63 हजार 816 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 102 कोटी 94 लाख 1 हजार 119 च्या वर गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 12,428

देशात 24 तासात डिस्चार्ज – 15,951

देशात 24 तासात मृत्यू – 356

एकूण रूग्ण – 3,42,02,202

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 1,63,816

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,35,83,318

एकूण मृत्यू  – 4,55,068

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 1,02,94,01,119 

गेल्या 24 तासातील लसीकरण – 

इतर बातम्या :

लालपरीचा प्रवास महागला, कोकण ते मुंबई, पुण्याच्या तिकीटावर 75 रुपयांची भाडेवाढ

Hacks For Skin Glow : सुपर हेल्दी स्किन मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा