Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घसरण

| Updated on: Oct 10, 2021 | 10:23 AM

गेल्या 24 तासात भारतात 18 हजार 166 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 214 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 23 हजार 624 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घसरण
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली. कालच्या दिवसात देशात 18 हजार 166 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 214 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या अडीच लाखांच्या आत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 18 हजार 166 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 214 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 23 हजार 624 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 39 लाख 53 हजार 475 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 71 हजार 915 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 50 हजार 589 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 30 हजार 971 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 94 कोटी 70 लाख 10 हजार 175 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 18,166

देशात 24 तासात डिस्चार्ज – 23,624

देशात 24 तासात मृत्यू – 214

एकूण रूग्ण – 3,39,53,475

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,30,971

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,32,71,915

एकूण मृत्यू  – 4,50,589

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 94,70,10,175

गेल्या 24 तासातील लसीकरण – 43,09,52

देशात कालच्या दिवसात आढळलेल्या 18 हजार 166 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एकट्या केरळामध्ये 12 हजार 616 रुग्ण सापडले आहेत. तर 214 कोरोनाबळींपैकी केरळमधील 134 जणांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज