AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या दोन दिवसांत 21 हजारांनी वाढ, सक्रिय रुग्णसंख्याही वाढतीच

गेल्या 24 तासात भारतात 46 हजार 164 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 607 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 159 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या दोन दिवसांत 21 हजारांनी वाढ, सक्रिय रुग्णसंख्याही वाढतीच
corona
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 26, 2021 | 9:48 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 9 हजारांनी वाढ झाली. गेल्या दोन दिवसांची आकडेवारी पाहता, नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 21 हजारांची वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 46 हजार 164 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 607 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 46 हजार 164 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 607 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 159 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 25 लाख 58 हजार 530 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 88 हजार 440 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 36 हजार 365 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 33 हजार 725 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 60 कोटी 38 लाख 46 हजार 475 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 46,164

देशात 24 तासात डिस्चार्ज – 34,159

देशात 24 तासात मृत्यू – 607

एकूण रूग्ण – 3,25,58,530

एकूण डिस्चार्ज – 3,17,88,440

एकूण मृत्यू – 4,36,365

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,33,725

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 60,38,46,475

गेल्या 24 तासातील लसीकरण – 80,40,407

संबंधित बातम्या :

भारतात झायडस कॅडिला लसीच्या वापरास मंजुरी, आपत्कालीन वापरास DCGI कडून मंजुरी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने धाकधूक, राज्यात एका दिवसात 216 कोरोनाबळी, मृत्यूदरातही वाढ

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर