पायाला सूज, थकवा आणि श्वासनाचा त्रास… या तीन गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; कारण…

| Updated on: Jul 25, 2021 | 10:23 AM

पायाला सूज येत असेल, वारंवार थकवा जाणवत असेल आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हयगय करू नका. (Protect Heart)

पायाला सूज, थकवा आणि श्वासनाचा त्रास... या तीन गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; कारण...
Heart
Follow us on

नवी दिल्ली: पायाला सूज येत असेल, वारंवार थकवा जाणवत असेल आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हयगय करू नका. हृदयाशी संबंधित हा आजार असू शकतो. त्यावर वेळीच उपचार केला पाहिजे. गेल्या 20 वर्षांतील अनेकांच्या मृत्यूचं कारण हृदयरोगाशी संबंधित आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. हृदयाच्या मांसपेशी रक्ताला पुरेशा प्रमाणात पंप करत नाहीत, तेव्हा हृदय रोगाला सुरुवात होते. त्यामागे अनेक कारणं असू शकतात. रक्तवाहिन्यांचं अंकूचन पावणं, उच्च रक्तदाब, हृदयाचं हळूहळू कमकुवत होणं किंवा कठोर होणं. असं झाल्यास हृदयाला रक्ताचा पुरेसा पुरवठा होत नाही.

FACES फॉर्म्युला काय?

हार्ट फेल्युअर सोसायटी ऑफ अमेरिकेने हृदयरोगाशी संबंधित संकेत समजून घेण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे. FACES असं या फॉर्म्युल्याचं नाव आहे. या फॉर्म्युल्यानुसार F= Fatigue म्हणजे थकवा, A= Activity Limitaion म्हणजे शारीरिक हालचालीत कमतरता, C= Congestion म्हणजे रक्त गोठणे, E=Edema or Ankle Swelling याचा अर्थ पायाला येणारी सूज आणि S= Shortness of breathचा अर्थ श्वास घेण्यास येणारा त्रास.

हृदयरोगापासून वाचायचं असेल तर हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब करता येऊ शकतो. त्यामुळे निम्मा म्हणजे 50 टक्के धोका टाळता येतो. फॉर्म्युलाप्रमाणे सूचवलेले संकेत वेळीच कळले तर हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो, असं हावर्ड इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचं म्हणणं आहे.

Fatigue म्हणजे थकवा: रक्तात ऑक्सिजनची कमतरता

हृदयरोग असलेल्या अनेक महिलांना संपूर्ण आठवडाभर थकवा आणि झोपेची समस्या उद्भवते. रक्तात ऑक्सिजनची कमतरता असल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचं अर्कांसस यूनिव्हर्सिटीने म्हटलं आहे.

Activity Limitation हालचाली कमी: ब्लॉकेजमुळे त्रास शक्य

व्यायाम करताना किंवा शारीरिक हालचाली करताना ब्लॉकेजमुळे व्यवस्थित रक्ताभिसरण होत नाही. त्यामुळे छातीत दुखू लागतं. किंवा हृदयावर अतिरिक्त दबाव येत असल्याचं जाणवू लागतं. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात.

Congestion रक्त गोठणे : वॉल्व्हची समस्या

हृदयाची धडधड होत असेल, डोकं दुखत असेल किंवा घाबरल्या सारखं वाटत असेल तर वॉल्व्हशी संबंधित समस्या असल्याचे हे संकेत आहेत. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या शोधानुसार, ब्लड प्रेशर वेगाने कमी होण्याचा हा संकेत आहे. हे संकेत वेळीच ओळखून आजाराला रोखता येऊ शकतं.

Edema म्हणजे पाय सूजणे: कमकूवत रक्त प्रवाह

हृदय रक्ताला योग्य पद्धतीने पंप करत नसल्याचे हे संकेत असू शकतात. जेव्हा हृदय आवश्यक वेगाने रक्ताला पंप करत नसेल तर रक्त वाहिन्यांमध्ये परत जातं. त्यामुळे सूज येते.

Shortness of breath श्वसनाचा त्रास : वॉल्व्हमध्ये कमी

छोटी छोटी कामं केल्यानंतरही दम लागत असेल आणि वारंवार हा त्रास होत असेल, झोपताना किंवा आराम करतानाही श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ही हृदयाच्या वॉल्व्हशी संबंधित समस्या असू शकते. त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

 

संबंधित बातम्या:

सतत कोरड्या खोकल्याने हैराण आहात? जाणून घ्या कारण आणि या खोकल्यावरचे घरगुती उपाय

Health Tips : आपण पोटफुगीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग या गोष्टी खाणे टाळा

अनियमित खाण्यामुळेच नाही तर या वैद्यकीय कारणांमुळे वाढते वजन, जाणून घ्या याबद्दल सर्व माहिती